Jeff Bezos Wedding: जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस त्यांच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. जेफ बेझोस यांनी 27 जून 2025 रोजी व्हेनिसमध्ये त्यांची दीर्घकाळची मैत्रीण लॉरेन सांचेझशी लग्न केले. भव्य लग्नानंतर, जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी लॉरेन सांचेझ यांनी त्यांच्या मित्रांसह एक खास पजामा पार्टी आयोजित केली. या पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांना अमेझॉनकडून एक खास भेटवस्तू देण्यात आली. जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचा लग्नाचा कार्यक्रम इटालियन लॅगून शहरात 3 दिवस चालला. त्यात वेलकम टाईट डिनर, आउटडोअर लग्न समारंभ आणि पजामा पार्टी असे कार्यक्रम होते.
हेही वाचा - 'प्राडा'ने कोल्हापुरी चप्पलची नकल केल्याने कोल्हापुरकर संतप्त
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाला सुमारे 200 पाहुण्यांनी हजेरी लावली. पाहुण्यांमध्ये बिल गेट्स, किम कार्दशियन, ख्लो कार्दशियन, जॉर्डनची राणी रानिया, काइली जेनर, केंडल जेनर, ओप्रा विन्फ्रे, ऑरलँडो ब्लूम आणि गेल किंग सारखे दिग्गज उपस्थित होते. जेफ बेझोस यांच्या लग्नाला नताशा पूनावाला यांनीही हजेरी लावली. नताशाला यापूर्वीही लॉरेन सांचेझसोबत अनेकदा पाहिले गेले आहे.
हेही वाचा - Jeff Bezos-Lauren Sánchez Wedding: जेफ बेझोस करणार लॉरेन सांचेझशी विवाह! भव्य लग्नसोहळ्यात काय असणार खास?
जेफ बेझोसच्या लग्नात पाहुण्यांना देण्यात आली 'ही' भेटवस्तू
लग्नानंतर झालेल्या पजामा पार्टीला स्वीट नाईट असे नाव देण्यात आले. या पार्टीमध्ये कोणत्याही पाहुण्यांनी नाईटवेअर घातले नव्हते. जेफ बेझोसच्या लग्नात पाहुण्यांना खास चप्पल गिफ्ट म्हणून देण्यात आल्या. या पार्टीमध्ये स्टायलिश क्वीन किम कार्दशियनने प्लंजिंग नेकलाइन घातली होती. बिल गेट्सने प्राडाचा डिझायनर पायजमा घातला होता. त्याच वेळी, आशेरने निळा टक्सिडो घातला होता आणि ओप्रा विन्फ्रेने तपकिरी रंगाचा सिल्क ड्रेस घातला होता. या पार्टीमध्ये, वधू लॉरेन सांचेझने गुलाबी रंगाचा सिल्क आणि शिफॉनचा अटेलियर वर्साचा गाऊन घातला होता.