मोठी बातमी! युक्रेनमधील भारतीय औषध निर्मिती कारखान्यावर रशियाचा ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी

विविध आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लक्ष्य करण्यात आलेला कारखाना 'कुसुम हेल्थकेअर' (Kusum Healthcare) या भारतीय औषध निर्मिती कंपनीचा होता.
मोठी बातमी! युक्रेनमधील भारतीय औषध निर्मिती कारखान्यावर रशियाचा ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी
Kusum Healthcare Ukraine attack

Kusum Healthcare Ukraine Attack: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले असून, रशियाने युक्रेनमधील सुमी (Sumy) शहरात केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात एका औषध निर्मिती कारखान्याला लक्ष्य केले आहे. या प्राणघातक हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. विविध आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लक्ष्य करण्यात आलेला कारखाना ‘कुसुम हेल्थकेअर’ (Kusum Healthcare) या भारतीय औषध निर्मिती कंपनीचा होता. मात्र, याबाबत दोन्ही देशांच्या प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

हल्ल्यांचा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींकडून तीव्र निषेध

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. रशियन सैन्याने केवळ सुमीच नव्हे, तर कीव्हमधील ‘पिव्हनिचनी पूल’ आणि निप्रो येथील दळणवळण केंद्रांवरही हल्ले चढवले आहेत. झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ या एकाच आठवड्यात रशियाने 1,900 हून अधिक ड्रोन्स, 1,700 हवाई बॉम्ब आणि 25 क्षेपणास्त्रांचा वापर करून युक्रेनवर तुफान मारा केला आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या ड्रोन्सपैकी 800 हून अधिक ड्रोन्स हे अद्ययावत जेट-इंजिनवर चालणारे होते.

निवासी भाग आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर माहिती देताना सांगितले की, रशियाने रात्रभरात 135 अटॅक ड्रोन्सद्वारे युक्रेनच्या विविध भागांवर हल्ले केले, ज्यातील 50 हून अधिक ड्रोन्स जेट-इंजिनवर चालणारे होते. रशियन सैन्याने कीव्ह, निप्रो, खार्किव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझ्झिया या भागांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या दहशतवादी हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य सामान्य निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधा होत्या. या हल्ल्यांमुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, मदत व बचाव पथके तातडीने बाधित ठिकाणी काम करत आहेत.

हेही वाचा – इंडोनेशियात 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; जोरदार हादऱ्यांमुळे नागरिकांची घरे सोडून पळापळ

जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची युक्रेन भेट; मदत पॅकेजची शक्यता

हे भीषण हल्ले सुरू असतानाच जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी युक्रेनला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. रशियाची युद्ध यंत्रणा भविष्यात इतर युरोपीय देशांवरही आक्रमण करू शकते, असा इशारा देत मर्झ यांनी युक्रेनला सर्व आवश्यक लष्करी मदत देण्याचे आश्वासन दिले. एएफपी (AFP) च्या वृत्तानुसार, जर्मनी आणि युक्रेनदरम्यान 1 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या लष्करी मदत पॅकेजवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. रशियन हल्ल्यांना रोखण्यासाठी युक्रेनने अधिक प्रगत इंटरसेप्टर्सची मागणी केली असून, या भेटीमुळे युरोपचा युक्रेनला असलेला खंबीर पाठिंबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version