Bridge Collapse : सर्वत्र पळापळ अन् घबराट… पूल कोसळून तब्बल 32 हून अनेक जणांनी गमावला जीव; गृहमंत्र्यांनी सांगितले…

डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दक्षिणेकडील भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 32 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Bridge Collapse : सर्वत्र पळापळ अन् घबराट… पूल कोसळून तब्बल 32 हून अनेक जणांनी गमावला जीव; गृहमंत्र्यांनी सांगितले…

डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दक्षिणेकडील भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 32 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दक्षिणेकडील लुलाबा प्रांतातील मुलोंडो भागातील कलांडो खाणीत शनिवारी पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना झाली.

प्रादेशिक गृहमंत्री रॉय काउंबा मायोंडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, बेकायदेशीर खाण कामगारांना मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रवेश करण्यास मनाई केली होती. मात्र तरी देखील ते प्रतिबंधित ठिकाणी गेले होते. काँगोच्या खाणकाम सहाय्य आणि मार्गदर्शन सेवेच्या अहवालानुसार सैनिकांनी त्याठिकाणी गोळीबार केला.

ज्यामुळे गोंधळ उडाला आणि पळापळ झाल्यामुळे पूल  कोसळला. यादरम्यान धक्काबुक्कीत अनेक जण गंभीर जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला. तसेच खाणीत सैनिकांची उपस्थिती हा बेकायदेशीर खाण कामगार, खाणीचे व्यवस्थापन करणारी सहकारी संस्था आणि खाणीचे अधिकृत मालक यांच्यात अनेक दिवसांपासून वादाचा मुद्दा राहिला आहे.

अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान SAEMAPE च्या अहवालानुसार मृतांचा आकडा किमान 40 हून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. काँगो हा जगातील कोबाल्टचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. काँगोच्या कोबाल्ट उत्पादनापैकी सुमारे 80 टक्के उत्पादन चिनी कंपन्यांच्या नियंत्रणाखाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number