Congress Honors Michelle Bachelet : भारतविरोधकाचा कॉंग्रेसकडून गौरव

मिशेल बॅचेलेट यांच्यावर विरोधकांचे आक्षेप काय आहेत ते पाहूया. 

Congress Honors Michelle Bachelet : भारतविरोधकाचा कॉंग्रेसकडून गौरव

प्रासाद काथे, प्रतिनिधी : भारतविरोधी मिशेल बॅचेलेट यांना काँग्रेसकडून पुरस्कार देण्यात आल्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. मिशेल बॅचेलेट यांनी सातत्याने भारत विरोधी भूमिका घेतली आहे. अशा व्यक्तीला भारतात बोलावून काँग्रेसने सन्मानित केलं आहे. मिशेल बॅचेलेट यांच्यावर विरोधकांचे आक्षेप काय आहेत ते पाहूया. 

१. चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचेलेट (२००६-१०) यांना ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ मिळणे हा एक योगायोग ठरला आहे. युएनएचआरसी पूर्वेतिहास बघितल्यास त्यांनी सातत्याने ‘लेफ्ट – लिबरल’ टुलकिटचा वापर करून भारतास लक्ष्य केले आहे. जगात कार्यरत भारतविरोधी इकोसिस्टीम जी भाषा बोलते, तीच भाषा काँग्रेसही बोलते; त्यामुळे काँग्रेसने बॅचलेट यांचा सन्मान करणे स्वाभाविक आहे. 
२. चिलीच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी धोरणे आखल्याबद्दल मिशेल बॅचेलेट यांच्यावर त्यांच्यात देशात मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येते. त्यांच्या अतिशय चुकीच्या धोरणांमुळे चिलीमध्ये आता उजव्या विचारसरणीस जनाधार मिळू लागला आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून मात्र त्यांना पुरस्कारासाठी पात्र ठरवले जात आहे. एकीकडे भाजप जागतिक पातळीवर भारताच्या वाढत्या क्षमतेस अधोरेखित करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस मात्र देशाबाहेरून पाठिंबा मिळवण्यासाठी वादग्रस्त परकीय नेत्यांना पुरस्कार देत आहे. परिणामी, देशाबाहेरूनच मान्यता मिळवण्यावर काँग्रेसचा भर असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. 
३. केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर बॅचेलेट यांनी भारतावर टिका केली. त्यावेळी, या निर्णयामुळे काश्मीरला खऱ्या अर्थाने समान अधिकार मिळाले असल्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. काँग्रेसने मात्र त्यांच्या वक्तव्यांचा वापर करून भारताने लोकशाहीविरुद्ध काम केले असा दावा केला होता. 
४. दिल्ली दंगलींवरील त्यांच्या टिप्पण्याही पूर्णपणे एकांगी, हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या आणि भारतास असहिष्णू ठरविणाऱ्या होत्या. काँग्रेसने त्यावेळीदेखील केंद्र सरकारवर टिका करण्यासाठी त्यांच्या विधानांना उचलून धऱले होते. 
५. सीएएविरुद्ध तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे वक्तव्य करण्यापर्यंत बॅचेलेट यांची मजल गेली होती. हा भारताच्या सार्वभौमत्वास थेट आव्हान देण्याचा प्रकार होता. मात्र, यासही काँग्रेसने समर्थन देऊन आपला अजेंडा रेटण्यासाठी त्याचा वापर केला होता. 
६. कथित स्वयंसेवी संस्था आणि कथित सामाजिक कार्यकर्त्यांविषयीची त्यांची मते भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेस आव्हान देणारी आहेत. परकीय निधीचे आणि त्याचा भारतविरोधी मोहिमांमध्ये वापर करणाऱ्या त्यांच्या मतांनाही काँग्रेसने उचलून धरले आणि भारताच्या घटनात्मक संस्थांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. 
७. शेतकरी आंदोलनादरम्यानही त्यांनी देशद्रोहाच्या प्रकरणांविषयी दिशाभूल करणारे दावे केले होते. अर्थात, आपल्या अशा धोरणांमुळे भारतात अशांतता निर्माण होण्यास हातभार लागल्याचे बॅचेलेट यांनी मान्य केले नाही. यावेळीही देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला तरीही काँग्रेसने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांचे समर्थन. 
८. "भारतात नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे" असा दावा करताना बॅचेलेट यांनी भारतातील सार्वजनिक क्षेत्र जगातील सर्वात मुक्त आणि उत्साही क्षेत्रांपैकी एक आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसनेही त्यांच्या दाव्यास पाठिंबा दिला आणि जागतिक पातळीवर भारतविरोधी भूमिका घेतली. 
९. "अल्पसंख्याकांचे हक्क" याबद्दलची त्यांची मांडणी एका विशिष्ट कथाकनाची री ओढणारी आहे. ‘भारतीय मुस्लिम सतत भीतीमध्ये राहतात’ या काँग्रेसच्या बनावट दाव्याचाच पुनरुच्चार त्या करतात. आपल्या लांगुलचालनाच्या राजकारणास पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार करणे, हे काँग्रेसच्या भूमिकेशी सुसंगतच आहे. 
१०. त्यांनी मानवी हक्कांचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला आहे. भारताचे जागतिक पातळीवर नकारात्मक चित्र तयार करण्यासाठी मानवी हक्कांचा वापर करण्यात येतो. काँग्रेसनेही आपल्या राजकारणासाठी बॅचेलेट यांच्या मतांना उचलून धरले. 
११. समाजवादी पार्श्वभूमी असलेल्या बॅचेलेट यांनी नेहमीच मजबूत राष्ट्रवादी भूमिका घेणाऱ्या सरकारांबद्दलची नकारात्मक भूमिका घेतली आहे. परिणामी भारतात जनाधार गमावलेल्या काँग्रेसला आपले राजकीय नैराश्य लपपविण्यासाठी त्यांच्या मतांचा पुरस्कार करावा लागत आहे. 
१२. काँग्रेसे बॅचेलेट यांना पुरस्कार शांतीची भूमिका घेण्याविषयी नव्हे तर सातत्याने भारतविरोधी भूमिका घेण्याविषयी दिल्याचे दिसते. त्याचवेळी बॅचेलेट या आपल्या भाजपविरोधास पाठिंबा देत असल्याचाही आनंद काँग्रेसला आहे. यावरून काँग्रेसचे हितसंबंध काय प्रकारचे आहेत, याचा अंदाज येतो. 
१३. “भारतात मुस्लिमांना दुय्यम स्थान आहे” हा त्यांचा आरोप तर घटनात्मक सुरक्षा, कल्याणकारी योजना आणि समान संधींकडे दुर्लक्ष करणारा होता. मात्र, याचाही वापर काँग्रेसने आपल्या राजकारणासाठी केला. 
१४. बॅचेलेट यांनी नेहमीच भारतात होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनांकडे दुर्लक्ष केले आहे. अर्थात, आपल्या अधोगतीच्या काळातही राजकीय स्वार्थ साधण्याचे धोरण असलेला काँग्रेस त्यांच्या भारतविरोधी धोरणास मान्य करताना दिसतो. 
१५. मुख्य प्रश्न अतिशय स्पष्ट आहे. भारताच्या सार्वभौमत्वास आव्हान देणाऱ्या व्यक्तीस काँग्रेस पक्ष पुरस्कार का?. त्याचे उत्तर तितकेच सोपे आहे – बॅचेलेट यांची भूमिका ही जनाधार गमावलेल्या काँग्रेससाठी सोयीस्कर आहे. 
१६. काँग्रेसची ही भूमिका केवळ मिशेल बॅचेलेटबद्दलच नाही. तर, काँग्रेसने भारताला लक्ष्य करणाऱ्या प्रत्येक सुरात सूर मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे भाजप भाजप भारताची जागतिक स्थिती मजबूत करण्यासाठी काम करत असताना दुसरीकडे काँग्रेस भारतास कमकुवत करणाऱ्यांना पुरस्कार देत आहे. अर्थात, भारतीय जनता सुज्ञ असून ती सर्वकाही पाहत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number