वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ 3 शास्त्रज्ञांना मिळाला जगातील सर्वोच्च सन्मान

स्वीडनमधील स्टॉकहोम येथील नामांकित कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये (Karolinska Institute) या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यासोबतच जगभरात उत्सुकता असलेल्या 'नोबेल पुरस्कार सप्ताहा'चीही औपचारिक सुरुवात झाली आहे.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ 3 शास्त्रज्ञांना मिळाला जगातील सर्वोच्च सन्मान
Nobel Prize in Medicine 2026

Nobel Prize in Medicine 2026: सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize in Physiology or Medicine) अधिकृत घोषणा करण्यात आली. यावर्षी कार्ल डायसेरोथ (Karl Deisseroth), पीटर हेगेमन (Peter Hegemann) आणि जॉर्ज नागेल (Georg Nagel) या 3 दिग्गज शास्त्रज्ञांना संयुक्तपणे हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम येथील नामांकित कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये (Karolinska Institute) या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यासोबतच जगभरात उत्सुकता असलेल्या ‘नोबेल पुरस्कार सप्ताहा’चीही औपचारिक सुरुवात झाली आहे.

कोणत्या विशेष संशोधनासाठी मिळाला सन्मान?

कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना ‘लाईट-गेटेड आयन चॅनल्स’ (light-gated ion channels) आणि ‘ऑप्टोजेनेटिक्स’ (optogenetics) या वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. या 3 शास्त्रज्ञांनी मेंदूतील विशिष्ट मज्जापेशींची (Nerve Cells) क्रिया प्रकाशाच्या साहाय्याने सुरू किंवा बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक प्रणालींवर सखोल संशोधन केले आहे. हे तिन्ही शास्त्रज्ञ अमेरिका आणि जर्मनी येथील प्रतिष्ठित विद्यापीठांशी संबंधित आहेत. यावर्षीच्या नोबेल पुरस्काराची एकूण रक्कम 1 कोटी 20 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 1.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) इतकी निश्चित करण्यात आली असून ती या विजेत्यांमध्ये विभागली जाईल.

2015 मधील नोबेल विजेत्यांचा आढावा

शरीरक्रियाशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील हा नोबेल पुरस्कार 1901 पासून सातत्याने दिला जात आहे. यापूर्वी 2025 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रुन्को (Mary E. Brunkow), फ्रेड रॅम्सडेल (Fred Ramsdell) आणि शिमोन साकागुची (Shimon Sakaguchi) या 3 शास्त्रज्ञांना ‘पेरिफेरल इम्युन टॉलरन्स’ संबंधित महत्त्वपूर्ण शोधांसाठी देण्यात आला होता. ही यंत्रणा मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला अनियंत्रित होण्यापासून रोखण्यास मदत करते.

हेही वाचा – ‘Rockstar!’; न्यूयॉर्क टाईम्सच्या फ्रंटपेजवर स्थान, तुकाराम मुंढेंचा जगभरात डंका

दरम्यान, 2025 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना, तर रसायनशास्त्रातील नोबेल सुसुमु किटागावा, रिचर्ड रॉब्सन आणि ओमर एम. याघी यांना मिळाले होते. साहित्यातील नोबेल हंगेरियन लेखक लास्झ्लो क्रास्झनाहोर्काई यांना, अर्थशास्त्रातील नोबेल जोएल मोकीर, फिलिप ॲगियन व पीटर हॉविट यांना, तर शांततेचे नोबेल व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना प्रदान करण्यात आले होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number