Strait of Hormuz: हॉर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज केवळ 15 जहाजांनाच मंजुरी; इराणच्या कडक अटींमुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात

इराण आता या मार्गावरून दररोज केवळ 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी देणार आहे. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावरील शिपिंग ऑपरेटर्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Strait of Hormuz: हॉर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज केवळ 15 जहाजांनाच मंजुरी; इराणच्या कडक अटींमुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात

Strait of Hormuz: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जहाजांच्या वाहतुकीवर इराणने कडक निर्बंध लादले आहेत. रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'TASS' ने दिलेल्या अहवालानुसार, इराण आता या मार्गावरून दररोज केवळ 15 जहाजांनाच जाण्याची परवानगी देणार आहे. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावरील शिपिंग ऑपरेटर्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत सरकारचा 'ॲक्शन प्लॅन'; एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर
इराणच्या या निर्णयामुळे देशात इंधन संकट निर्माण होऊ नये, यासाठी भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्रालय सक्रिय झाले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशात सध्या घरगुती एलपीजी सिलिंडर्सचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून तो अखंडित ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या देशभरात दररोज 58 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडर्सचे वितरण केले जात आहे. तसेच, व्यावसायिक सिलिंडर्सची उपलब्धता देखील 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

विक्रमी इंधन विक्री आणि उपलब्धता
देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी देशात 6,700 टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली आहे, जी सुमारे 3,50,000 सिलिंडर्सच्या बरोबरीची आहे. यासोबतच, सुमारे 1,06,000 पाच-किलो वजनाच्या छोट्या सिलिंडर्सचीही विक्री झाली आहे. या आकडेवारीवरून सरकार इंधन साठवणूक आणि वितरणाबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

हेही वाचा – Strait of Hormuz : होर्मूजमधील सुरक्षित वाहतुकीसाठी फ्रान्सच्या नेतृत्वाखाली 15 देश एकत्र; नौदलांच्या मदतीने 'प्लॅन बी' सक्रिय

हॉर्मुझ सामुद्रधुनी: जगाची सामरिक आणि आर्थिक जीवनवाहिनी
इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेला केवळ 34 किलोमीटर रुंदीचा हा जलमार्ग जगाची आर्थिक जीवनवाहिनी मानला जातो. हा मार्ग आखाती देशांना हिंदी महासागराशी जोडतो. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा याच अरुंद पट्ट्यातून वाहतूक केला जातो. केवळ तेलच नव्हे, तर खते आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या जागतिक व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. इराणने येथे निर्बंध लादल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number