Monday, June 23, 2025 11:31:46 AM

Earthquake In Pakistan: पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला! 'किती' होती भूकंपाची तीव्रता? जाणून घ्या

भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोक घराबाहेर पडले. 4.6 तीव्रतेच्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

earthquake in pakistan पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला किती होती भूकंपाची तीव्रता जाणून घ्या
Earthquake In Pakistan प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Earthquake In Pakistan: भारताच्या हवाई हल्लाने हादरलेल्या पाकिस्तानला आता भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. या भूकंपाचे केंद्र पश्चिम पाकिस्तानमध्ये होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 मोजण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोक घराबाहेर पडले. 4.6 तीव्रतेच्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दुपारी 1:26 वाजता झाला.

यापूर्वी शनिवारी, 10 मे रोजीही पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.0 होती. भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप पहाटे 1:44 वाजता झाला होता. या भूकंपाचे केंद्रही पश्चिम पाकिस्तानमधील क्वेट्टाजवळ होते. गेल्या आठवड्यातही, सोमवारी पाकिस्तानला 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

हेही वाचा - Fact Check: ताजमहालवरील पाकिस्तानच्या हल्ल्याचा बनावट व्हिडिओ व्हायरल; आग्रा पोलिसांनी सांगितले सत्य

अलिकडच्या काळात जगाच्या अनेक भागात भूकंपांच्या घटना घडत आहे. आपल्या पृथ्वीच्या आत 7 टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स त्यांच्या जागी सतत फिरत असतात. तथापि, यात कधीकधी टक्कर किंवा घर्षण होते. या कारणास्तव, पृथ्वीवर भूकंपाच्या घटना घडतात. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. भूकंपामुळे घरे कोसळतात आणि हजारो लोक ढिगाऱ्याखाली दबून मृत्युमुखी पडतात.

हेही वाचा - देशभरातील 32 विमानतळं वाहतुकीसाठी खुली 

भारतातील भूकंप क्षेत्र - 

दरम्यान, भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते भारताच्या एकूण भूभागापैकी सुमारे 59 टक्के भूभाग भूकंपप्रवण मानला जातो. शास्त्रज्ञांनी भारतातील भूकंप क्षेत्राचे झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 असे 4 भाग केले आहेत. झोन-5 मधील भाग सर्वात संवेदनशील मानले जातात, तर झोन-2 कमी संवेदनशील मानले जातात. आपल्या देशाची राजधानी दिल्ली भूकंप झोन-4 मध्ये येते. 
 


सम्बन्धित सामग्री