पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची लाट; 25 हजार नागरिक रस्त्यावर, नियंत्रण रेषेकडे कूच

नियंत्रण रेषेच्या (LoC) अगदी जवळ असलेल्या मंधोल क्षेत्रात सुमारे 25 हजारांहून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून भव्य जनआंदोलन छेडले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची लाट; 25 हजार नागरिक रस्त्यावर, नियंत्रण रेषेकडे कूच
‘आम्हाला पाकिस्तानात राहायचे नाही’; नागरिकांचा PoK मध्ये एल्गार

PoK Protests 2026: पाकच्या बेकायदेशीर अधिपत्याखालील काश्मीरमध्ये स्थानिक जनतेने पाकिस्तान सरकारविरोधात उघड बंड पुकारले आहे. नियंत्रण रेषेच्या (LoC) अगदी जवळ असलेल्या मंधोल क्षेत्रात सुमारे 25 हजारांहून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून भव्य जनआंदोलन छेडले आहे. “आम्हाला पाकिस्तानात राहायचे नसून भारतात सामील व्हायचे आहे,” अशा थेट आणि आक्रमक घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या भव्य निदर्शनांदरम्यान पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या ‘जॉइंट अवामी लीग’ने पाकिस्तान प्रशासनाला पुंछ आणि मेंढरचे भारतीय सीमा मार्ग तात्काळ मोकळे करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

मानवी हक्कांचे उल्लंघन अन् तीव्र टंचाई

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 5 जूनपासून सुरू असलेल्या या जनआंदोलनाचा 115 वा दिवस पूर्ण झाला आहे. मुझफ्फराबादसह विविध भागांतून हजारो नागरिक नियंत्रण रेषेच्या दिशेने चालत येत आहेत. हे आंदोलन चिरडण्यासाठी पाकिस्तानी प्रशासनाने संपूर्ण भागाची रसद आणि पुरवठा साखळी खंडित केली आहे. स्थानिक बाजारात पीठ, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, नागरिकांना उपाशी ठेवून आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आमची नैसर्गिक साधनसंपत्ती लुटली, मात्र आता सहनशीलतेचा अंत झाला असून आरपारची लढाई लढली जाईल,” असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे.

हेही वाचा – SIR प्रकरणाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला आव्हान

संतप्त आंदोलकांकडून थेट दगडफेक

PoK मधील स्थानिकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि पोलिसांच्या विना-नंबरप्लेटच्या गाड्यांचा (‘डाला ब्रिगेड’) वापर करून लोकांना पळवून नेले जायचे. मात्र, आता या ‘डाला ब्रिगेड’ची दहशत पूर्णपणे संपुष्टात आली आहे. संतप्त आंदोलक ISI च्या गाड्यांवर थेट दगडफेक करत असल्याने, जनसागराच्या तीव्र आक्रोशाला पाहून ISI आणि पोलिसांची पथके आंदोलन स्थळांवर फिरकण्याचेही टाळत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number