PM Modi 3 Nation Visit: पंतप्रधान मोदींचा तीन देशांच्या दौऱ्यावर; जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानसोबच्या संबंधांना मिळणार अधिक बळकटी

पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील भारताचे राजनैतिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

PM Modi 3 Nation Visit: पंतप्रधान मोदींचा तीन देशांच्या दौऱ्यावर; जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानसोबच्या संबंधांना मिळणार अधिक बळकटी

PM Modi 3 Nation Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले असून या दौऱ्यात ते जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार आहेत. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील भारताचे राजनैतिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रस्थानापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी यांनी या भेटी ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी प्रथमच जॉर्डनच्या हाशेमाइट किंगडमला भेट देणार आहेत. राजा अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून होणारी ही भेट भारत-जॉर्डन राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 75 व्या वर्षानिमित्त विशेष ठरणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी राजा अब्दुल्ला द्वितीय, जॉर्डनचे पंतप्रधान जाफर हसन तसेच क्राउन प्रिन्स अल हुसेन बिन अब्दुल्ला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य, प्रादेशिक घडामोडी आणि सामायिक हितसंबंधांवर सविस्तर चर्चा करणार आहेत.

यानंतर पंतप्रधान मोदी इथिओपिया प्रजासत्ताकाला भेट देतील. इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या निमंत्रणावरून होणारा हा दौरा पंतप्रधान मोदींचा इथिओपियातील पहिलाच अधिकृत दौरा आहे. आफ्रिकन युनियनचे मुख्यालय आदिस अबाबा येथे असल्याने इथिओपियाचे महत्त्व अधोरेखित होते. भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला जी20 चे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले, ही बाब या भेटीत विशेषत्वाने अधोरेखित होणार आहे.

हेही वाचा – Sydney Mass Shooting: सिडनी गोळीबार प्रकरणाला आंतरराष्ट्रीय किनार; इस्रायल-ऑस्ट्रेलिया तणाव वाढण्याची शक्यता

इथिओपियामध्ये पंतप्रधान मोदींना संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची संधी मिळणार असून ते भारताच्या लोकशाही परंपरेचा प्रवास आणि जागतिक दक्षिणेसाठी भारत-इथिओपिया भागीदारीचे महत्त्व मांडणार आहेत. याशिवाय ते पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करतील आणि तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा – H1b Visa Scrutiny: ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; H-1B आणि H-4 व्हिसांवर होणार सोशल मीडिया स्क्रिनिंग

मोदी ओमानला भेट देणार 

दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान मोदी ओमानला भेट देणार आहेत. भारत-ओमान राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट होत आहे. मस्कतमध्ये ते ओमानचे सुलतान यांच्याशी धोरणात्मक भागीदारी, व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा करतील. यावेळी पंतप्रधान मोदी ओमानमधील भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित करणार असून, ओमानच्या विकासात आणि दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यात या समुदायाच्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे. या तीन देशांच्या दौऱ्यामुळे भारताचे पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील संबंध नव्या उंचीवर जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number