Putin in India: भारत दौऱ्यावर पुतीन यांचे विशेष विमान; त्यावरील ‘Poccия’ या शब्दाचा अर्थ काय?

पुतिन भारतात आल्यानंतर मोदी यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. मात्र सर्वाधिक चर्चा पुतिन यांच्या IL-96 विमानावरील लाल अक्षरातील &quotРоссия&quot या शब्दाची झाली.

Putin in India: भारत दौऱ्यावर पुतीन यांचे विशेष विमान; त्यावरील ‘Poccия’ या शब्दाचा अर्थ काय?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्या आगमनाने दिल्लीतील वातावरणच बदलले. पुतिन यांचे विशेष विमान पालम विमानतळावर उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिथे उपस्थित राहून त्यांनी भव्य स्वागत केले. हस्तांदोलनानंतर दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसले आणि त्यानंतर एकाच वाहनातून विमानतळ सोडत त्यांनी मैत्रीचा संदेश दिला.

मात्र या भेटीइतकाच चर्चेचा विषय ठरला तो पुतिन यांच्या विमानावरील एक शब्द. विशेष बनवलेल्या इल्युशिन IL-96 या विमानातून ते भारतात आले असून विमानावर मोठ्या लाल अक्षरात लिहिलेल्या त्या शब्दामुळे सोशल मीडियावर आणि विमानप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विमानावर नेमकं काय लिहिलं आहे? आणि त्याचा अर्थ काय? हा प्रश्न सर्वांना पडू लागला. हेच विमान पुतिन यांच्या अलास्का दौऱ्यातही वापरले गेले होते. त्यावेळीही विमानावरील शब्दामुळे मोठी चर्चा झाली होती. त्या दौऱ्यात पुतिन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट ठरली होती आणि युक्रेन युद्धाच्या शांततेसाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. तेव्हा अनेक विमानतज्ज्ञांनी दोन्ही नेत्यांच्या विमानांची तुलना करून विश्लेषण केले होते.

हेही वाचा: RBI Repo Rate Cut: वर्षाच्या शेवटी सर्वात मोठी खुशखबर! EMI वर मोठा ब्रेक, घर-गाडी घेण्याचं स्वप्न आता होणार साकार

रशियन राष्ट्राध्यक्षांचे हे विमान इल्युशिन IL-96 या अत्याधुनिक मॉडेलवर आधारित आहे. जगभरातील सुरक्षा निकष लक्षात घेऊन खास डिझाइन केलेल्या या विमानात कम्युनिकेशन ते संरक्षण यंत्रणांपर्यंत सर्वकाही सुपर-सीक्रेट मोडमध्ये बसवलेले असते. पण विमानावर लिहिलेल्या एका शब्दाने संपूर्ण लक्ष वेधून घेतले आहे. विमानाच्या पुढील भागावर लाल अक्षरांत "Россия" असे लिहिलेले दिसते. हा शब्द सिरमिलिक वर्णमालेत लिहिला जातो आणि त्याचा अर्थ सरळ "रशिया" असा होतो. मात्र अनेकांना हा शब्द उच्चारायलाही कठीण गेल्याने सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज रंगू लागले.

पुतिन यांच्या विमानातून उतरतानाही हा शब्द विशेष उठून दिसत होता. पुतिन यांच्या विमानाचे हे आकर्षक आणि रहस्यमय अस्तित्व, कडक सुरक्षा व्यवस्था आणि मोदी यांनी केलेलं प्रोटोकॉलच्या पलीकडे जावून स्वागत या सर्व गोष्टींमुळे पुतिन यांचा भारत दौरा पहिल्याच क्षणी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. दोन दिवसांच्या या उच्चस्तरीय भेटीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि अनेक संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर, पुतिन यांच्या विमानावरील त्या एका शब्दाचा सस्पेन्स 'Россия' अजूनही अनेकांसाठी चर्चेचा विषय बनलेला आहे.

हेही वाचा: Psycho Killer Poonam: 'तिने लग्नाआधी मुलांना मारलं…' सायको किलर पूनमच्या आईने केले थक्क करणारे खुलासे

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number