Putin to Visit India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 5-6 डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शिखर बैठक घेतील, जिथे जागतिक राजकारण, सुरक्षा आणि व्यापारसंबंधी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी ऑगस्टमध्ये मॉस्कोला भेट दिली तेव्हा या उच्चस्तरीय भेटीची प्राथमिक घोषणा करण्यात आली होती. नंतर चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पुतिन आणि मोदी यांची कारमध्ये साधारण तासभर बैठक झाली.
हेही वाचा - US Government Shutdown: अमेरिकेत सरकारी शटडाऊन; लाखो कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजा, याचा देशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
दरम्यान, पुतिन यांचा हा दौरा अशा वेळी होणार आहे जेव्हा अमेरिकेने रशियाच्या तेल खरेदीसाठी भारतावर कर लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपकडे पारंपरिक पुरवठा वळवण्याच्या निर्णयामुळे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर 50 टक्के कर लादल्याचा दावा केला. भारताचे म्हणणे आहे की, रशियाकडून तेल खरेदी हा देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि अर्थसंकल्पीय गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.
हेही वाचा - Donald Trump: अखेर डोनाल्ड ट्रम्पनं उघडं केली महत्वाकांक्षा; 'या' कारणासाठी आवळला जातोय टॅरिफचा फास, ऐकून व्हाल थक्क
भारत आणि रशियाचे संबंध दशकांपासून सुदृढ आहेत. सोव्हिएत काळापासून भारत रशियासोबत व्यापार, संरक्षण आणि शस्त्रास्त्र पुरवठा क्षेत्रात जवळचे सहकारी राहिले आहेत. आजही रशिया भारताचा प्रमुख शस्त्रास्त्र पुरवठादार असून भारत हे रशियाचे महत्त्वाचे तेल ग्राहक देशांपैकी एक आहे.
दरम्यान, विश्लेषकांचे म्हणणे आहे की, पुतिन यांचा भारत दौरा अमेरिकेकडून वाढत्या व्यापार दबावाच्या पार्श्वभूमीवर भारताची राजनैतिक रणनीती दृढ करण्यासाठी महत्त्वाचा आहे.