LNG Export Capacity: कतारमधील गॅस प्लांट उद्ध्वस्त; भारताच्या गॅस पुरवठ्यावर पाच वर्षे संकट? कतारने सांगितली काळजाचा ठोका चुकवणारी वस्तुस्थिती

कतारच्या महत्त्वाच्या एलएनजी प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे देशाच्या गॅस निर्यात क्षमतेपैकी सुमारे 17 टक्के क्षमता बाधित झाली आहे.

LNG Export Capacity: कतारमधील गॅस प्लांट उद्ध्वस्त; भारताच्या गॅस पुरवठ्यावर पाच वर्षे संकट? कतारने सांगितली काळजाचा ठोका चुकवणारी वस्तुस्थिती

कतार: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. कतारच्या महत्त्वाच्या नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे द्रवीकृत नैसर्गिक वायू उत्पादनाला मोठा धक्का बसला आहे. कतार एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऊर्जा व्यवहारांचे राज्यमंत्री साद अल-काबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमुळे देशाच्या एलएनजी निर्यात क्षमतेपैकी सुमारे 17 टक्के क्षमता बाधित झाली आहे. यामुळे दरवर्षी सुमारे 20 अब्ज डॉलर इतक्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अल-काबी यांनी सांगितले की, हल्ल्यांमध्ये कतारच्या 14 एलएनजी उत्पादन युनिट्सपैकी किमान दोन युनिट्स आणि दोन गॅस-टू-लिक्विड सुविधांपैकी एक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे. या नुकसानाची दुरुस्ती करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असून त्याचा परिणाम पुढील अनेक वर्षे उत्पादनावर होणार आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे दरवर्षी सुमारे 12.8 दशलक्ष टन एलएनजी उत्पादन पुढील तीन ते पाच वर्षे बाधित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशिया आणि युरोपातील अनेक देशांच्या ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण होऊ शकतो.

या संदर्भात साद अल-काबी यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “रमजानसारख्या पवित्र महिन्यात कतारसारख्या देशावर असा हल्ला होईल, याची कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती. विशेषतः एखाद्या मुस्लिम मित्रदेशाकडून असा हल्ला होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.” हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीमुळे कतार एनर्जीला काही आंतरराष्ट्रीय पुरवठा करारांवर ‘स्थगिती’ जाहीर करावी लागली आहे.

हेही वाचा: Pramod Sawant : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात अँजिओग्राफी; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

यामुळे इटली, बेल्जियम, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या देशांना पाठवण्यात येणाऱ्या एलएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही करारांवर पाच वर्षांपर्यंत अनपेक्षित अडथळे येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे आशिया आणि युरोपमधील ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अल-काबी यांच्या मते, या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम देशांमधील शत्रुत्व आणि संघर्ष थांबणे अत्यावश्यक आहे. त्यांनी सांगितले की, उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी आणि उद्योग पूर्ववत करण्यासाठी शांतता आवश्यक आहे. इराणने त्यांच्या गॅस पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर खाडी प्रदेशातील तेल आणि गॅस प्रकल्पांवर प्रतिहल्ले केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कतारमधील रास लाफान या मोठ्या एलएनजी प्रकल्पावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली.

या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीमुळे संपूर्ण प्रदेशाच्या ऊर्जा उद्योगाला 10 ते 20 वर्षे मागे ढकलले जाऊ शकते, अशी चिंता अल-काबी यांनी व्यक्त केली. पूर्वी सुरक्षित आणि स्थिर ऊर्जा केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले. नुकसानग्रस्त एलएनजी प्रकल्पांमध्ये अमेरिकेची एक्सॉनमोबिल कंपनी भागीदार असून, जीटीएल प्रकल्पात शेल कंपनीची भागीदारी आहे. या सुविधांच्या दुरुस्तीसाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे; विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर मुंबईतही पावसाची हजेरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number