India Oil Gas Reserves: भारतासाठी दिलासादायक बातमी! ‘या’ देशाच्या वाळवंटात भारतीय कंपन्यांना सापडला तेल अन् वायूचा अथांग साठा

इराणमधील संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी परदेशात एक अभूतपूर्व कामगिरी साध्य केली आहे.

India Oil Gas Reserves: भारतासाठी दिलासादायक बातमी! ‘या’ देशाच्या वाळवंटात भारतीय कंपन्यांना सापडला तेल अन् वायूचा अथांग साठा

India Oil Gas Reserves: इराणमधील संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी परदेशात एक अभूतपूर्व कामगिरी साध्य केली आहे. 'ऑइल इंडिया' (Oil India) आणि 'इंडियन ऑइल' यांच्या नेतृत्वाखालील समूहाने लिबियाच्या 'घदामेस खोऱ्यात' (Ghadames Basin) तेल आणि वायूचा नवीन साठा शोधून काढला आहे. हा शोध भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने 'गेम-चेंजर' ठरू शकतो.

'एरिया 95' मध्ये 8,500 फूट खोलीवर शोध
लिबियामधील 'एरिया 95' (Area 95) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉकमध्ये भारतीय अभियंत्यांनी जमिनीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 8,500 फूट खोलीपर्यंत यशस्वी वेधन (ड्रिलिंग) केले आहे. या विहिरीतून सध्या दररोज सुमारे 352 बॅरल्स कच्चे तेल आणि 600 हून अधिक 'स्टँडर्ड क्यूबिक फूट' वायूचे उत्पादन होत आहे. विहिरीच्या चाचणी टप्प्यादरम्यान 24/64-इंचाच्या व्हॉल्व्हद्वारे हायड्रोकार्बन्स बाहेर काढण्यात आले, ज्यातून या साठ्याची भक्कम दाब क्षमता सिद्ध झाली आहे.

भारताचा दीर्घकालीन संघर्ष आणि अभूतपूर्व यश
भारत या प्रदेशात अनेक वर्षांपासून संशोधन आणि उत्खनन कार्य करत होता. अखेर भारतीय कंपन्यांना यामध्ये मोठे यश (breakthrough) मिळाले आहे. विशेष म्हणजे, लिबियासारख्या कठीण भू-राजकीय परिस्थिती असलेल्या देशात हे यश मिळवून भारतीय अभियंत्यांनी आपले जागतिक कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हा तेलसाठा जमिनीवर (onshore) असल्याने समुद्रातील उत्खननाच्या तुलनेत तेल काढणे अधिक सुलभ आणि किफायतशीर ठरणार आहे.

ऊर्जा सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला मिळणारा बूस्टर
भारत सध्या आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल परदेशातून आयात करतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी चढ-उतार आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यावर होणारा परिणाम भारतासाठी चिंतेचा विषय असतो. मात्र, परदेशात स्वतःच्या मालकीच्या तेल विहिरी असण्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल. स्वतःच्या कंपन्यांनी परदेशी भूमीवर तेलाचे उत्खनन केल्यामुळे दीर्घकाळात देशाच्या परकीय चलन साठ्याची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळेल.

हेही वाचा – Content Blocking : आक्षेपार्ह मजकुराचा विळखा तीव्र! केंद्र सरकारच्या सोशल मीडियावरील 'ब्लॉकिंग'च्या आदेशांमध्ये दुप्पट वाढ; या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक कारवाई

भविष्यातील संधी
नजीकच्या भविष्यात भारताला लिबियामधून तेल आणि वायूचा आपला वाटा मिळवणे शक्य होणार आहे. जागतिक संघर्षाच्या काळात झालेला हा नवीन शोध भारतीय जनतेसाठी मोठा दिलासा देणारा असून, यामुळे ऊर्जा क्षेत्रातील भारताचे परावलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. 'ऑइल इंडिया'साठी हा प्रकल्प भविष्यातील प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number