Tuesday, November 11, 2025 11:06:31 PM

Kilauea Volcano : हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीचा 200 वर्षांत चौथ्यांदा उद्रेक! 'दैत्याच्या शिंगांसारखे' 1500 फूट उंच लाव्हाचे दोन फव्वारे

किलाउआचा हा नयनरम्य देखावा विज्ञानावर आधारित आहे. तसेच, तो डोळे दिपवून टाकणारा भयंकरही आहे.

kilauea volcano  हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीचा 200 वर्षांत चौथ्यांदा उद्रेक दैत्याच्या शिंगांसारखे 1500 फूट उंच लाव्हाचे दोन फव्वारे

Kilauea Volcano Two Streams of Lava : जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या हवाई बेटावरील किलाउआ ज्वालामुखीने पुन्हा एकदा मोठा उद्रेक केला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच डिसेंबरपासून, हा ज्वालामुखी आतापर्यंत 34 वेळा फुटला आहे. यावेळचा उद्रेक विशेष होता; कारण लाव्हाचे दोन फवारे असे बाहेर पडले, जणू ती एखाद्या 'दैत्याच्या डोक्यावरील दोन शिंगे' आहेत. यातून 1300 ते 1500 फूट (सुमारे 400 मीटर) उंचीचे लाव्हाचे फवारे बाहेर पडले; जे न्यूयॉर्कमधील 100 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही उंच होते.

6 तास चाललेला उद्रेक आणि सुरक्षितता
हा उद्रेक बुधवारी झाला आणि तो सुमारे 6 तास चालला. शास्त्रज्ञांच्या मते, हे सर्व उद्रेक एकाच मोठ्या स्फोटाचा भाग आहेत, जिथे मॅग्मा (ज्वालामुखीच्या आत असलेला वितळलेला खडक) एकाच मार्गाने पृष्ठभागावर येत आहे. या उद्रेकात, दक्षिणेकडील छिद्रातून लाव्हाचे फवारे बाहेर फेकले गेले. सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, हा सर्व लाव्हा हवाई व्होल्कॅनो नॅशनल पार्कच्या आतील क्रेटरमध्ये (खड्ड्यात) राहिला. त्यामुळे कोणत्याही निवासी भागाला किंवा इमारतींना धोका पोहोचला नाही. जे लोक पार्कला भेट देऊ शकत नाहीत, ते अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (USGS) लाइव्ह स्ट्रीमवर हा अद्भुत नजारा पाहू शकतात.

हेही वाचा - दिल्लीत Cloud Seeding चा प्रयोग फ्लॉप? पाऊस न पडण्यावर IIT कानपूरच्या वैज्ञानिकांचे स्पष्टीकरण; 'या' कारणाने तात्पुरता ट्रायल थांबवला

लावा फव्वारे तयार होण्यामागील विज्ञान
किलाउआचा हा नयनरम्य देखावा विज्ञानावर आधारित आहे. हलेमाऊमाऊ क्रेटरच्या खाली मॅग्मा कक्ष आहे, जो पृथ्वीच्या आतून प्रति सेकंद सुमारे 3.8 क्यूबिक मीटर मॅग्मा शोषून घेतो. हा कक्ष फुग्याप्रमाणे फुगतो आणि मॅग्माला वरच्या कक्षात ढकलतो, ज्यामुळे तो भेगांमधून पृष्ठभागावर येतो. मॅग्मामध्ये असलेल्या वायूंच्या दाबामुळे आणि अरुंद छिद्रातून बाहेर पडताना गॅस फुटल्यामुळे, लाव्हा हवेत उंच उडतो – जसे शॅम्पेनची बाटली हलवून तिचे झाकण उघडल्यानंतर होते. हवाई युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीव्ह लुंडब्लाड यांच्या मते, छिद्र मोठे झाल्यास दाब कमी होतो आणि फवारे लहान होतात.

200 वर्षांतील 4 था असा नमुना
गेल्या 200 वर्षांत किलाउआने अशा लाव्हा फव्वार्‍यांची मालिका चौथ्यांदा दाखवली आहे. यापूर्वी 1959, 1969 आणि 1983 मध्ये असे उद्रेक झाले होते. 1983 मध्ये सुरू झालेल्या उद्रेकात 44 भाग होते आणि तो दूरच्या भागात असल्याने कमी लोकांना पाहता आला. हा उद्रेक 35 वर्षे चालला आणि 2018 मध्ये थांबला. हवाई वोल्केनो ऑब्झर्व्हेटरीच्या वैज्ञानिकांच्या मते, मॅग्माचा दाब वाढून खाली नवीन छिद्र उघडून लाव्हा सतत वाहू लागेल किंवा मॅग्मा कमी झाल्यास तो थांबेल. सध्या शास्त्रज्ञ लाव्हा कधी बदलेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - Gmail Password Leak: 183 दशलक्ष वापरकर्त्यांचे पासवर्ड लीक! Gmail वापरकर्त्यांमध्ये खळबळ; Google ने दिलं स्पष्टीकरण


सम्बन्धित सामग्री