हॉलीवूड गायिका-अभिनेत्री सेलेना गोमेजने इमिग्रेशन धोरणांवर भावना व्यक्त करत एक व्हिडिओ शेअर केला होता, जो तिने नंतर डिलीट केला. या व्हिडिओत ती अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याच्या धोरणांमुळे भावूक होताना दिसली. “माझ्या लोकांवर हल्ला होत आहे, लहान मुलं यात अडकली आहेत. मी काही करू शकत नाही याचं खूप वाईट वाटतं,” असं रडत सेलेनाने सांगितलं.
तिच्या या कृतीनंतर ती सोशल मीडियावर टीकेचा बळी ठरली. डाव्या विचारांच्या मंडळींनी तिचं कौतुक केलं, तर काही उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी तिच्यावर टीका केली. प्रसिद्ध टीव्ही होस्ट टॉमी लाह्रेनने सेलेनाला “सर्टिफाईड मूर्ख” म्हटलं. “डिज्नीच्या बालकलाकारांकडून आम्ही राजकीय सल्ला घेत नाही,” असं लाह्रेनने म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कडक धोरणं आखण्यात आली होती. एका दिवसातच 956 अटकसत्रं आणि 554 निवडपत्रिका जारी करण्यात आल्या, अशी माहिती ICE (इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट) विभागाने दिली.
सेलेनाने यापूर्वीही ट्रम्पच्या धोरणांवर टीका केली होती. ऑक्टोबरमध्ये एका मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या लोकांसाठी मी नेहमी उभी राहीन.”
ती फक्त राजकीय विषयांवरच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत असते. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सेलेनाने तिच्या म्युझिक प्रोड्यूसर बॉयफ्रेंड बेनी ब्लॅन्कोसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.