Tuesday, December 09, 2025 11:08:33 AM

US Govt Shutdown : अमेरिकेत 'शटडाउन'चा 6 वा आठवडा; लाखो कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले, 'समझोता नाही' म्हणत ट्रम्प प्रशासनाची ताठर भूमिका

अमेरिकेतल शटडाऊनमुळे सामान्य नागरिकांवर विपरीत परिणाम होत आहे. या शटडाउनमुळे अमेरिकेतील प्रशासकीय व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

us govt shutdown  अमेरिकेत शटडाउनचा 6 वा आठवडा लाखो कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले समझोता नाही म्हणत ट्रम्प प्रशासनाची ताठर भूमिका

US Govt Shutdown : अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद (Government Shutdown) पडल्यामुळे निर्माण झालेला संकट आता सहाव्या आठवड्यात दाखल झाले आहे. यामुळे देशभरातील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना वेतनाशिवाय काम करावे लागत आहे किंवा त्यांना सक्तीच्या सुट्टीवर (Furlough) पाठवण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्ससोबत (Democrats) कोणताही समझोता करण्यास नकार दिल्याने हा गतिरोध (Standoff) कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा सरकारी शटडाउन बनला आहे.

देशभरात सेवा ठप्प, अर्थव्यवस्थेवर परिणाम
या शटडाउनमुळे अमेरिकेतील प्रशासकीय व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकारी सेवा ठप्प झाल्यामुळे सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. याचा सेवांवर परिणाम झाला आहे, देशभरातील विमानतळांवर उड्डाणे रद्द होत आहेत. अन्न मदत कार्यक्रम (Food Aid Programs) प्रभावित झाले आहेत, तसेच सरकारी कर्ज (Government Loans) थांबल्यामुळे छोटे उद्योजक अडचणीत आले आहेत.
आर्थिक नुकसान: राष्ट्रीय उद्याने आणि संग्रहालये बंद पडली आहेत आणि अनेक सरकारी कंत्राटदार (Contractors) दिवाळखोरीच्या (Bankruptcy) उंबरठ्यावर आहेत, ज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे.

हेही वाचा - US Shutdown Effect: अमेरिकेतील शटडाऊनचा हवाई सेवांवर परिणाम; दुसऱ्या दिवशीही 1000 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द

ट्रम्प यांचा 'आरोग्य धोरणा'बाबत ताठर पवित्रा
या गतिरोधावर तोडगा काढण्यासाठी सिनेटचे (Senate) खासदार प्रथमच एकत्र आले आहेत, परंतु दोन्ही पक्षांच्या चर्चेतून कोणताही मार्ग निघत नाहीये. डेमोक्रॅट्सची मागणी आहे की, सरकारने आधी फेडरल बजेट (Federal Budget) मंजूर करावे आणि नंतर धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करावी. याउलट, ट्रम्प प्रशासन आरोग्य धोरण (Health Policy) आणि सीमा सुरक्षा (Border Security) या मुद्द्यांना एकत्रित जोडूनच चर्चा करण्यावर अडून बसले आहे.
ओबामाकेअरवर हल्ला: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (8 नोव्हेंबर 2025) सोशल मीडियावर स्पष्ट केले की, ते डेमोक्रॅट्ससोबत समझोता करण्यास तयार नाहीत. त्यांनी 'अफोर्डेबल केअर ॲक्ट' (ओबामाकेअर) वर हल्ला करत ते जगातील सर्वात खराब हेल्थ सर्विस सिस्टम असल्याचे म्हटले.
ट्रम्प यांचा प्रस्ताव : ट्रम्प यांची इच्छा आहे की, काँग्रेसने थेट नागरिकांना पैसे द्यावेत, जेणेकरून ते स्वतः विमा खरेदी करू शकतील. या प्रस्तावामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल होऊ शकतात, परंतु डेमोक्रॅटिक पक्षाने हा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळला आहे.

'फिलिबस्टर' नियम बदलण्याची मागणी
शटडाउनच्या या संकटात ट्रम्प यांनी आणखी एक वादग्रस्त सूचना केली आहे. त्यांनी रिपब्लिकन खासदारांना 'फिलिबस्टर' (Filibuster) नियम रद्द करण्यास सांगितले आहे. या नियमानुसार, कोणताही कायदा मंजूर करण्यासाठी सिनेटमध्ये 60 मतांची आवश्यकता असते. हा नियम संपुष्टात आणल्यास रिपब्लिकन पक्ष साध्या बहुमताने (Simple Majority) कायदे मंजूर करू शकेल आणि डेमोक्रॅट्सला पूर्णपणे डावलता येईल.

हेही वाचा - US Soldiers Missing: अमेरिकेचे 40 हजार सैनिक गायब! समुद्रात शोधकार्य सुरू; नेमकं प्रकरण काय?


सम्बन्धित सामग्री