Mohsin Naqvi: ट्रॉफीचोर मोहसिन नक्वीला पाकिस्तानकडून ‘गोल्ड मेडल’; भारताला आशिया कप ट्रॉफी न दिल्याबद्दल सन्मान

पाकिस्तानचे ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी याला भारताला आशिया कप ट्रॉफी न दिल्याबद्दल गोल्ड मेडल देण्यात येणार आहे. हा सन्मान पाकिस्तानकडून भारताला दिलेला प्रतीकात्मक आणि राजकीय संदेश मानला जात आहे.

Mohsin Naqvi: ट्रॉफीचोर मोहसिन नक्वीला पाकिस्तानकडून  ‘गोल्ड मेडल’; भारताला आशिया कप ट्रॉफी न दिल्याबद्दल सन्मान

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचा (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी याला “शहीद झुल्फिकार अली भुट्टो एक्सलन्स गोल्ड मेडल” या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, आशिया कप ट्रॉफी हस्तांतरण प्रकरणात नक्वी याने घेतलेली “ठाम आणि धाडसी भूमिका” देशाच्या अभिमानाचे प्रतीक ठरली आहे.

अलीकडेच झालेल्या आशिया कप अंतिम सामन्यानंतर नक्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. ट्रॉफी वितरणावेळी भारतीय खेळाडूंनी त्याच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. या कृतीला अनेकांनी “राजकीय संदेश” असे म्हटले. त्यानंतर नक्वी याने ती ट्रॉफी स्वतःकडे ठेवली आणि सोशल मीडियावर लिहिले “भारतीय संघाला जर ही ट्रॉफी खरंच हवी असेल, तर ते ती ACC मुख्यालयातून घेऊ शकतात.”

नक्वी याने पुढे स्पष्ट केले, “मी काही चुकीचे केले नाही, आणि मी बीसीसीआयची माफी मागणार नाही.” त्याच्या या भूमिकेचे पाकिस्तानमधील राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आहे. त्यामुळे त्याला देशातील एक प्रतिष्ठित नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : World Para Athletics Championship 2025 : राजधानीत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट; निशाद-सिमरनचे 'सुवर्ण' यश, आतापर्यंत 15 पदकांची कमाई

कराचीमध्ये पुरस्कार सोहळ्याची तयारी

या सन्मानाचा औपचारिक कार्यक्रम कराची येथे होणार आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सिंध बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खालिद जमील शम्सीच्या नेतृत्वाखाली होणार असून, कराचीचे क्रीडा संचालक गुलाम मोहम्मद खानची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट गुलाम अब्बास जमालने सांगितले, “हा सन्मान फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही. हा देशाच्या स्वाभिमानाचा, सार्वभौमत्वाचा आणि बाह्य दबावाखाली न झुकण्याच्या भूमिकेचा गौरव आहे.”

आशिया कप वाद आणि राजनैतिक पार्श्वभूमी

अलीकडील आशिया कप स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला दिसून आला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा कठोर प्रोटोकॉल लागू केला होता. अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला, परंतु ट्रॉफी नक्वी याच्या हस्ते स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला.

या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी हे प्रकरण आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या बैठकीत मांडण्याची तयारी सुरू केली आहे.

ही घटना भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत सीमापार दहशतवादी तळांवर कारवाई केली.

नक्वी याला मिळणारा हा सन्मान फक्त क्रीडाजगतापुरता मर्यादित नसून, पाकिस्तानकडून भारताला दिलेला राजकीय आणि प्रतीकात्मक संदेश म्हणून पाहिला जात आहे.

हेही वाचा : KL Rahul Century: ऐतिहासिक! भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत केएल राहुलचे धमाकेदार शतक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number