Nepal Flash Flood: चारही बाजूंनी पुराचा वेढा; नेपाळच्या महाप्रलयात ‘त्या’ व्हायरल बंगल्यातील लोकांचं पुढं काय झालं?

जलप्रलयाच्या या भीषणतेदरम्यान सोशल मीडियावर एका सुंदर बंगल्याचा थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

Nepal Flash Flood: चारही बाजूंनी पुराचा वेढा; नेपाळच्या महाप्रलयात ‘त्या’ व्हायरल बंगल्यातील लोकांचं पुढं काय झालं?

Nepal Flash Flood:  शेजारील नेपाळमध्ये कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण कोपाने महाप्रलयाचे रूप धारण केले असून, या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आणि बेपत्ता असणाऱ्यांचा आकडा वेगाने वाढत आहे. जलप्रलयाच्या या भीषणतेदरम्यान सोशल मीडियावर एका सुंदर बंगल्याचा थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये चारी बाजूंनी चिखलमय पुराचा प्रचंड प्रवाह वाहत असताना, बंगल्याच्या बाल्कनीत 3 ते 4 नागरिक असहाय्यपणे उभे असलेले दिसत होते. आजूबाजूच्या अनेक इमारती पुराच्या लाटांमध्ये पत्त्यांसारख्या कोसळत असताना या लोकांचे काय झाले, असा प्रश्न जगभरातून विचारला जात होता. मात्र, पुराचा एवढा मोठा वेढा असूनही ती वास्तू आणि त्यातील सर्व नागरिक सुरक्षित राहिल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Samay Raina And Devendra Fadnavis Video: ‘मी हे बिस्कीट घेऊ?’ समय रैनाने असं काही केलं की मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; पाहा मजेशीर Video

आपत्तीत 600 हून अधिक बळी; शेकडो भारतीयांचा शोध अद्याप सुरू
नेपाळ पोलिसांच्या ताज्या आकडेवारीनुसार, या जलप्रलयात आतपर्यंत 579 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय सुमारे 2500 हून अधिक लोक बेपत्ता असून त्यात 300 हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि बचाव पथके सतत स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून चीनच्या सीमेवर अडकलेल्या शेकडो भारतीयांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक पर्यटकही या भागात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेपाळ-तिबेट सीमेवरील ग्यिरोंग बंदरातील भयावह दृश्यांवर चीनची सेन्सॉरशिप
दुसरीकडे, नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरील महत्त्वाच्या ‘ग्यिरोंग’ आंतरराष्ट्रीय बंदरावर आलेल्या महापुराचा व्हिडिओही प्रचंड चर्चेत आला आहे. सीमाभागातील इमारती आणि रस्ते पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र, जगभरात व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमध्ये मात्र इंटरनेटवरून गायब करण्यात आला आहे. चिनी प्रशासनाच्या कडक सेन्सॉरशिप धोरणामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांपर्यंत पुराच्या विनाशाचे हे सत्य आणि मृतांची खरी आकडेवारी पोहोचू दिली जात नसल्याचे चित्र आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number