India-Bangladesh Relations: पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा भारताला पहिला झटका; नेमका काय निर्णय घेतला? वाचा सविस्तर

बांगलादेश सरकारने भारताच्या 'स्पाइसजेट' (SpiceJet) या विमान कंपनीला आपली हवाई हद्द वापरण्यापासून रोखले आहे.

India-Bangladesh Relations: पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा भारताला पहिला झटका; नेमका काय निर्णय घेतला? वाचा सविस्तर

India-Bangladesh Relations: बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारताला पहिला मोठा राजनैतिक आणि व्यावसायिक धक्का दिला आहे. बांगलादेश सरकारने भारताच्या 'स्पाइसजेट' (SpiceJet) या विमान कंपनीला आपली हवाई हद्द वापरण्यापासून रोखले आहे. या निर्णयामुळे कोलकाता ते गुवाहाटी आणि ईशान्य भारताकडे जाणाऱ्या विमानांना आता लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

नेमका वाद काय?
प्राप्त माहितीनुसार, ही कारवाई प्रामुख्याने थकबाकी (Outstanding Dues) न भरल्यामुळे करण्यात आली आहे. बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने 'स्पाइसजेट'वर नेव्हिगेशन शुल्क आणि इतर ऑपरेशनल चार्जेस थकवल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, या कारवाईच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या निर्णयाचा काय परिणाम होणार
बांगलादेशची हवाई हद्द नाकारल्यामुळे स्पाइसजेटच्या विमानांना आता पर्यायी आणि लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ज्यामुळे इंधन आणि वेळेचा खर्च वाढणार आहे. या बातमीचा परिणाम थेट कंपनीच्या आर्थिक स्थितीवर झाला असून, स्पाइसजेटचे शेअर्स सुमारे 1 टक्क्याने घसरले आहेत. दरम्यान, कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे की, ते बांगलादेशच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून थकबाकीचा मुद्दा लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या नियमानुसार उड्डाणे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Bill Gates: धक्कादायक! 'इंडिया AI समिट'मधून बिल गेट्स यांची माघार; ऐनवेळी माघार घेण्याचे कारण काय?

भारताची चिंता वाढली?
तारिक रहमान सत्तेत आल्यानंतर भारत-बांगलादेश संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, एका बाजूला भारतीय विमान कंपनीवर बंदी आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशने पाकिस्तानशी पुन्हा विमानसेवा सुरू करणे, या दोन्ही घटना भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात. यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तांत्रिक कारणास्तव ही बंदी असली, तरी बांगलादेशच्या नव्या सरकारची भारताप्रती असलेली भूमिका आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number