Wednesday, June 18, 2025 01:24:50 PM

एलोन मस्क यांनी आठवड्यातून किमान 40 तास काम करावे; टेस्ला गुंतवणूकदारांचे कंपनीच्या मंडळाला पत्र

बोर्ड चेअर रॉबिन डेनहोलम यांना पाठविलेल्या पत्रात गुंतवणूकदारांनी टेस्लाची घटती विक्री, घसरणारी स्टॉक किंमत आणि जागतिक प्रतिमेचे नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

एलोन मस्क यांनी आठवड्यातून किमान 40 तास काम करावे टेस्ला गुंतवणूकदारांचे कंपनीच्या मंडळाला पत्र

वॉशिंग्टन डी सी: टेस्लाच्या काही सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या मंडळाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना आठवड्यातून किमान 40 तास काम करण्याची विनंती करण्यात आली आहे. मस्क यांना टेस्ला येथे आठवड्यातून किमान 40 तास काम करण्यास सांगितले. या मागणीच्या पाठीमागचं कारण देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांच्या गटाचे म्हणणे आहे की, ही इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी एका कठीण टप्प्यातून जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून टेस्लाच्या अलीकडच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं सांगितलं जातं. हे सर्व मस्क यांचे त्यांच्या इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यामुळे झाले असून यामुळे गोष्टी अधिकच बिघडल्या असल्याचे टेस्लाच्या या गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.

सीएनबीसीच्या म्हणण्यानुसार, बोर्ड चेअर रॉबिन डेनहोलम यांना पाठविलेल्या पत्रात गुंतवणूकदारांनी टेस्लाची घटती विक्री, घसरणारी स्टॉक किंमत आणि जागतिक प्रतिमेचे नुकसान याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांचा असा विश्वास आहे की, यापैकी बरेच मुद्दे इतर प्रकल्पांमध्ये मस्क यांच्या सहभागाशी जोडलेले आहेत. यात त्यांच्या राजकीय क्रियाकलाप आणि स्पेसएक्स (SpaceX) आणि एक्सएआय (xAI) सारख्या इतर कंपन्यांमधील त्यांचे नेतृत्व यांचा समावेश आहे.

हेही वाचा - 'परदेशांतील कर्जदारांना रुपयांत कर्ज देण्याची बँकांना मुभा मिळावी'; रिझर्व्ह बँकेचा केंद्रासमोर प्रस्ताव

गुंतवणूकदार मस्क यांच्यासाठी कोणत्याही नवीन वेतन पॅकेजवर अटी लावण्यासाठी मंडळाला (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) उद्युक्त करीत आहेत. त्यांनी टेस्लासोबत पूर्णवेळ काम करावे, अशी त्यांची इच्छा आहे आणि संचालक इतर कंपन्यांवर किती वेळ घालवू शकतात याबद्दल बोर्डाने स्पष्ट नियम निश्चित करावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी टेस्लाला विद्यमान संचालकांशी वैयक्तिक संबंध नसलेल्या किमान एका स्वतंत्र मंडळाच्या सदस्याची नेमणूक करण्यास सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये एलॉन मस्क हे काही प्रमाणात सहभागी असल्यामुळे त्यांचं टेस्लाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा याआधी देखील झाली होती. एवढंच नाही तर त्यावरूनच काही दिवसांपूर्वी टेस्लातील गुंतवणूकदार निराश असल्याचंही बोललं जात होतं. तसेच इलॉन मस्क यांनी टेस्ला किंवा ट्रम्प यांच्यापैकी एकाची निवड केली पाहिजे, असा सल्ला देखील वॉल स्ट्रीटवरच्या प्रसिद्ध तज्ज्ञांनी मस्क यांना काही दिवसांपूर्वी दिल्याचं वृत्त समोर आलं होतं.

मस्क यांच्याकडून कंपनीकडे दिले जात असलेले लक्ष आणि दिल्या जात असलेल्या वेळावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, ही बाब काही प्रथमच घडलेली नाही. यापूर्वी, अमेरिकन कोर्टाने त्यांचे 56 अब्ज डॉलर्स किमतीचेपे डील रद्द करताना 2018 मध्ये असे म्हटले होते की, बोर्डाच्या निर्णयांवर त्यांचे जास्त नियंत्रण आहे. आता, मस्क टेस्लामध्ये अधिक स्वतःचा भाग आणखी विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. ते टेस्लामध्ये 25 टक्के मतदान नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे भागधारकांमध्ये अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.

आताच्या नवीन पत्रामागील गुंतवणूकदारांकडे टेस्लामधील सुमारे 8 दशलक्ष शेअर्स आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मस्क यांनी कंपनीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बोर्ड पुरेसे उपाय करत नाही आहे. आता जेव्हा टेस्लाची युरोपमधील विक्री झपाट्याने घसरली आहे, तेव्हा त्यांची निराशा पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर्षी कंपनीचा स्टॉक आधीच 12% खाली आला आहे. टेस्लाने आपले ब्रँड मूल्य देखील गमावले आहे, जे अमेरिकन कंपन्यांच्या लोकांच्या मतांचा मागोवा घेणार्‍या एका प्रमुख सर्वेक्षणात 95 व्या स्थानावर आहे.

या गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे की, एलॉन मस्क यांचं लक्ष सध्याच्या काळात स्पेसएक्स आणि एक्सएआयसह अनेक वेगवेगळ्या विभागात विभागलं गेलं आहे. त्यामुळे इलॉन मस्क यांचं टेस्लाकडे होणारं लक्ष कमी झालं आहे आणि त्याचाच परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत आहे. दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्लाच्या विक्रीत लक्षणीय घट होत चालली आहे. यामध्ये विशेषतः युरोपियन बाजारपेठेत ही घट होत असल्याचं दिसून येत आहे. टेस्लाच्या अलीकडच्या काळातील विक्रीत घट आणि जागतिक स्तरावरील कमी होत चाललेल्या प्रतिष्ठेबद्दल देखील चिंता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी हे आवाहन केलं आहे. टेस्लाच्या बाबतीत हा नकारात्मक ट्रेंड मस्क यांच्या राजकीय सहभागाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत मस्क पुरेसा वेळ टेस्लावर देत नाहीत तोपर्यंत कंपनीची बाजारपेठेतली स्पर्धात्मकता वाढणार नाही, असे गुंतवणूकदारांनी म्हटले आहे.

हेही वाचा - D Mart मध्ये साहित्य स्वस्त मिळतं.. पण एका शेअरची किंमत आहे हजारांमध्ये! कशी केली इतकी प्रगती?

या पार्श्वभूमीवरून गुंतवणूकदारांनी टेस्लाच्या संचालक मंडळाला एक पत्र लिहून टेस्लाच्या उत्पन्न आणि विक्रीत वाढ पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आणि शेअरहोल्डर्सचा विश्वास अजून जास्त बळकट करण्यासाठी इलॉन मस्क यांच्या टेस्लातील सहभागासंदर्भात कडक अटी घालण्याची विनंती  केली आहे. मस्क यांच्यासाठी भविष्यात टेस्लाशी पूर्णवेळ वचनबद्धतेची आवश्यकता आहे, असे यात सांगण्यात आले आहे. पण आता मस्क यांनी दुसऱ्या व्यवसायांवर किती वेळ घालवायचा? यावर मर्यादा घालणारे स्पष्ट नियम बोर्डाने आणले पाहिजेत, असं गुंतवणूकदारांनी म्हटलं आहे.

टेस्लाने गुंतवणूकदारांच्या या पत्राला उत्तर दिलेले नाही. परंतु, मस्क या आठवड्याच्या सुरुवातीस म्हणाले की, त्यांनी आपल्या व्यवसायांवर अधिक वेळ घालवण्याची योजना आखली आहे. त्यात टेस्लाचा समावेश आहे की नाही, हे अस्पष्ट आहे.


सम्बन्धित सामग्री