Wednesday, June 18, 2025 03:49:37 PM

ट्रम्प-मस्क यांच्यातील वाद संपला! एलोन मस्कने गेल्या आठवड्यात एक्सवर लिहिलेल्या पोस्टवर व्यक्त केला खेद

ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर मस्क आता पश्चात्ताप करत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टवर खेद व्यक्त करताना त्यांनी ट्रम्प यांच्यावर लिहिताना मर्यादा ओलांडल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प-मस्क यांच्यातील वाद संपला एलोन मस्कने गेल्या आठवड्यात एक्सवर लिहिलेल्या पोस्टवर व्यक्त केला खेद
Donald Trump Elon Musk
Edited Image

Donald Trump-Elon Musk Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्यातील बिघडलेले संबंध आता पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहेत. संबंध सुधारण्यासाठी एलोन मस्क यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर मस्क आता पश्चात्ताप करत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टवर खेद व्यक्त करताना त्यांनी ट्रम्प यांच्यावर लिहिताना मर्यादा ओलांडल्याचे म्हटले आहे.  

काय आहे नेमक प्रकरण? 

एलोन मस्क यांनी गेल्या आठवड्यात एक्सवर लिहिलेल्या पोस्टबद्दल खेद व्यक्त केला आहे. ही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लिहिली गेली होती. एलोन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक नवीन पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये मस्क यांनी लिहिले आहे की गेल्या आठवड्यात लिहिलेल्या माझ्या काही पोस्टबद्दल मला खेद आहे. 

डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्यात वाद का झाला? 

एलोन मस्क यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाच्या (DOGE) प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतरच दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. एलोन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खर्च आणि कर कपात विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ट्रम्प या विधेयकाला 'वन बिग ब्युटीफुल बिल' म्हणत आहेत, पण मस्क यांनी या विधेयकावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनीही मस्कच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. ट्रम्प यांनी टीकेला उत्तर म्हणून एक पोस्ट लिहिली आणि मस्क यांना विधेयकाबद्दल सांगितले.

हेही वाचा - 'भारतावर पुन्हा हल्ला झाला तर आम्ही...'; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला कडक इशारा

ट्रम्प यांनी एलोन मस्क यांना सांगितले की, या विधेयकात इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) ची सबसिडी कमी करण्याची तरतूद आहे, परंतु मस्कने एक्सवर पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले. मस्कने ट्रम्पला सांगितले की त्यांना विधेयकाचा मसुदा कधीच दाखवला गेला नाही. मस्कने एक्सवर पोस्ट लिहून ट्रम्पच्या महाभियोगालाही पाठिंबा दिला. त्यानंतर दोघांमधील वाद इतका वाढला होता की मस्कने ट्रम्पच्या जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. तथापि, ट्रम्पने याला जुना आणि खोटे प्रकरण म्हटले. 

हेही वाचा - द अमेरिका पार्टी…! ट्रम्पसोबत वाद झाल्यानंतर एलोन मस्कने घेतला मोठा निर्णय; स्वत:चा राजकीय पक्ष सुरू करणार

दरम्यान, दोघांमधील वाद वाढला तेव्हा डोनाल्ड ट्रम्पने एलोन मस्कला उघड धमकी दिली. त्यांनी सांगितले की ते एलोन मस्कच्या कंपन्यांशी, विशेषतः स्पेसएक्सशी सरकारी करार आणि सबसिडी संपवण्याचा निर्णय घेऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्पने एनबीसी न्यूजला टेलिफोनिक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, मस्कशी त्यांचे संबंध संपले आहेत. जर मस्कने डेमोक्रॅटिक उमेदवारांना निधी दिला तर रिपब्लिकन पक्षाच्या कर विधेयकाला विरोध करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मात्र, आता ट्रम्प यांनी माघार घेतली असून त्यांनी ट्रम्प विरोधात केलेल्या पोस्टवर खेद व्यक्त केला आहे.  
 


सम्बन्धित सामग्री