UNICEF on Childhood Obesity : ‘कुपोषणापेक्षा लठ्ठपणाची समस्या अधिक गंभीर’; मुलांच्या आरोग्याबाबत युनिसेफ’ने दिला धोक्याचा इशारा

या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी घर, शाळा आणि सरकार या तिन्ही स्तरांवर प्रयत्नांची गरज आहे. मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहार देण्यासोबतच रोज किमान 1 तास मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

UNICEF on Childhood Obesity : ‘कुपोषणापेक्षा लठ्ठपणाची समस्या अधिक गंभीर’; मुलांच्या आरोग्याबाबत युनिसेफ’ने दिला धोक्याचा इशारा

UNICEF Health Warning about Childhood Obesity : जागतिक स्तरावर मुलांच्या आरोग्याबाबत एक अत्यंत चिंताजनक कल समोर येत आहे. एकेकाळी केवळ कुपोषण हीच बालकांसाठी मोठी समस्या मानली जात होती, परंतु आता लठ्ठपणा (Obesity) हे त्याहून मोठे आव्हान बनले आहे. 'युनिसेफ'च्या ताज्या अहवालानुसार, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये लठ्ठ मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोबाईल आणि टीव्हीचा वाढलेला 'स्क्रीन टाइम' तसेच कमी झालेली शारीरिक हालचाल, बिघडलेले दिवसाचे वेळापत्रक आणि फास्टफूड खाण्याच्या वाढत्या सवयी यामुळे ही स्थिती ओढवली असून, भविष्यात हे एका मोठ्या आरोग्य संकटाचे रूप घेऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. याआधी या समस्या विकसित देशांमध्येच अधिक प्रमाणात भेडसावत होत्या. मात्र, आता त्या विकसनशील देशांमध्येही हाता-पाय पसरू लागल्या आहेत.

जीवनशैली आणि आहाराचा फटका
मुलांमध्ये वाढणाऱ्या या वजनामागे बदललेली जीवनशैली हे प्रमुख कारण आहे. डिजिटल युगामुळे मुले मैदानी खेळांपासून दुरावली असून तासनतास व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियात व्यस्त राहत आहेत. यासोबतच फास्ट फूड, पॅकबंद अन्नपदार्थ आणि साखरयुक्त पेयांचे अतिसेवन यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढत आहे. घरगुती आणि पौष्टिक आहाराची जागा आता 'जंक फूड'ने घेतल्याने मुलांची पचनशक्ती आणि चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

गंभीर आजारांना आमंत्रण
लहान वयात वाढलेले वजन हे केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून ते अनेक व्याधींचे मूळ ठरत आहे. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊ…
शारीरिक: मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी वयातच निर्माण होतो.
मानसिक: लठ्ठपणामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, ते सामाजिकरित्या एकाकी पडतात आणि अनेकदा चिडचिडेपणा किंवा नैराश्याची शिकार होतात.
हाडांचे विकार: वाढत्या वजनाचा ताण हाडांवर पडल्याने सांधेदुखी आणि इतर शारीरिक कटकटी सुरू होतात.

हेही वाचा – AC ला गुडबाय, फक्त जवळ ठेवा 'ही' वस्तू ; वाढत्या उष्णतेवर ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय

'डबल बर्डन' स्थितीचे आव्हान
भारतासारख्या देशात सध्या 'डबल बर्डन' म्हणजेच दुहेरी ओझ्याची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. एका बाजूला ग्रामीण भागात अजूनही कुपोषणाचा (Undernutrition) लढा सुरू आहे, तर दुसरीकडे शहरी भागातील मुले अति आहारामुळे किंवा चुकीच्या आहारामुळे लठ्ठ होत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर या दोन्ही परस्परविरोधी समस्यांवर एकाच वेळी तोडगा काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुरेसे अन्न न मिळणे आणि चुकीचे अन्न अति प्रमाणात मिळणे, या दोन्ही गोष्टी मुलांच्या भविष्यासाठी घातक ठरत आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय आणि पालकांची भूमिका
या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी घर, शाळा आणि सरकार या तिन्ही स्तरांवर प्रयत्नांची गरज आहे. मुलांना संतुलित आणि पौष्टिक आहार देण्यासोबतच रोज किमान 1 तास मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवून त्यांच्या शारीरिक सक्रियतेवर भर द्यावा. सरकारने देखील अन्न धोरणांमध्ये सुधारणा करून शाळांमधील पोषण कार्यक्रमात सकस आहाराचा समावेश वाढवणे गरजेचे आहे. जनजागृती मोहिमांद्वारे लठ्ठपणाच्या धोक्यांबद्दल समाजाला शिक्षित करणे हाच यावर प्रभावी उपाय ठरेल.

हेही वाचा – Food Poisoning Prevention: सावधान! 'हे' विसंगत पदार्थ एकत्र खाणं ठरू शकतं जीवघेणं; अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी घ्या ही खबरदारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number