Saturday, July 20, 2024 12:10:58 PM

Ghadge Memorial in Italy
भारतीय सैन्याच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण!

पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात मॉन्टोन येथे उभारण्यात आलेल्या 'व्ही. सी. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियल'चा विस्तार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

भारतीय सैन्याच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण

अपुलिया : जी - ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात मॉन्टोन येथे उभारण्यात आलेल्या 'व्ही. सी. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियल'चा विस्तार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 'व्ही. सी. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियल'चा विस्तार करण्याचे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतच्या बैठकीत दिले आहे. दुसर्‍या महायुद्धात भारताच्या लष्कराच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख इटली सरकारने केला आहे. व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते नायक यशवंत घाडगे हे मूळचे महाराष्ट्रातील माणगाव तालुक्यातील. त्यांना २२ व्या वर्षी १९४४ मध्ये वीरमरण आले. त्यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आले आहे. मोदी - मेलोनी भेटीत झालेल्या स्मारक विस्ताराबाबतच्या निर्णयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. 

दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या योगदानाचा इटलीने केला गौरव

दुसऱ्या महायुद्धात भारताच्या ५० हजारांपेक्षा जास्त सैनिकांनी पराक्रम गाजवला होता. इटलीमध्ये प्रदान करण्यात आलेल्या वीस व्हिक्टोरिया क्रॉस पदकांपैकी सहा पदके भारतीय सैनिकांनी जिंकली होती. या युध्दात २३ हजार ७२२ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. यापैकी पाच हजार ७८२ भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले होते. संपूर्ण इटलीमध्ये पसरलेल्या ४० राष्ट्रकुल युद्ध स्मशानभूमींमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर इटलीतील मोहिमेदरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच अप्पर टायबर व्हॅलीत लढताना हुतात्मा झालेले व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते नायक यशवंत घाडगे यांना आदरांजली म्हणून पेरुगियामधील मॉन्टोन येथे स्मारक उभारण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री