Strait of Hormuz Blockade: अमेरिका-इराण संघर्ष शिगेला; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या नाकेबंदीचा आदेश

ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक तात्काळ रोखण्याचे आदेश दिले आहेत.

Strait of Hormuz Blockade: अमेरिका-इराण संघर्ष शिगेला; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या नाकेबंदीचा आदेश

Strait of Hormuz Blockade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) हा जगातील महत्त्वाचा सागरी मार्ग पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक तात्काळ रोखण्याचे आदेश दिले आहेत. इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शस्त्रसंधीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा वगळता इतर मुद्द्यांवर एकमत झाले असतानाही, ही चर्चा फिस्कटल्याने आखाती देशांमधील तणाव आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

इराणच्या वसुलीला अमेरिकेचे लष्करी प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या संतापाचे मुख्य कारण म्हणजे इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून जाणाऱ्या जहाजांवर लावलेला अवाढव्य पथकर (Toll). अहवालानुसार, इराण या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक 'सुपरटँकर'कडून 20 लाख डॉलर्स वसूल करण्याची योजना आखत आहे. इराणला ही आर्थिक लूट करण्यापासून रोखण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ज्या जहाजांनी इराणला शुल्क दिले आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात रोखण्यात यावे आणि त्यांना सुरक्षित मार्ग दिला जाऊ नये. यामुळे आता समुद्रात अमेरिकन नौदल आणि इराणचे 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर संकट 
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा जगातील तेलाच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा 'चेकपॉइंट' मानला जातो. जागतिक सागरी तेलाच्या व्यापारापैकी सुमारे 25 टक्के आणि नैसर्गिक वायूच्या (LNG) वाहतुकीपैकी 20 टक्के वाटा याच अरुंद मार्गातून जातो. 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने या मार्गावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या नाकेबंदीच्या आदेशामुळे आता जागतिक स्तरावर, विशेषतः दक्षिण आशियाई देशांमध्ये इंधन आणि वायूचा पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली असून मोठ्या ऊर्जा संकटाची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा – Islamabad Missile Threat : मोठेपणा करायला गेला आणि तोंडावर आपटला! पाकिस्तानवर डागल्या जाणार मिसाईल्स?

दक्षिण आशियावर नाकेबंदीचे गंभीर परिणाम
इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षाचा थेट फटका भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांना बसण्याची शक्यता आहे. हा मार्ग बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते. इराणने आधीच या मार्गात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली असून, अनेक देशांच्या जहाजांनी मार्ग मिळवण्यासाठी इराणशी संपर्क साधला आहे. मात्र, अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आता या जहाजांना समुद्रातच अडकून पडावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. राजनैतिक मार्ग सोडून आता दोन्ही देश लष्करी बळाचा वापर करण्याच्या तयारीत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या सामुद्रधुनीकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number