US Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध पेटलं; अमेरिकेचा ‘बंदर खमीर’वर भीषण हवाई हल्ला; 7 जणांचा मृत्यू, स्फोटाचा थरारक व्हिडीओ समोर

अमेरिकेने इराणमधील हवाई हल्ल्यांची व्याप्ती वाढवत अनेक महत्त्वाचे पूल, विद्युत पायाभूत सुविधा आणि बंदरांना लक्ष्य केले.

US Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध पेटलं; अमेरिकेचा ‘बंदर खमीर’वर भीषण हवाई हल्ला; 7 जणांचा मृत्यू, स्फोटाचा थरारक व्हिडीओ समोर

US Iran Conflict: इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत तीव्र व धोकादायक वळणावर पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेने इराणमधील हवाई हल्ल्यांची व्याप्ती वाढवत अनेक महत्त्वाचे पूल, विद्युत पायाभूत सुविधा आणि बंदरांना लक्ष्य केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील (Strait of Hormuz) इराणची पकड ढिली करण्यासाठी आणि तेहरानवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

इराणच्या अधिकृत सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री इराणच्या दक्षिण होर्मोजगन प्रांतात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील ‘बंदर खमीर’ या किनारी शहराला प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले इराणचे मुख्य बंदर ‘बंदर अब्बास’ आणि राजधानी तेहरानसह देशाचे मध्यवर्ती भाग जोडणारे महामार्ग व रेल्वेचे मार्ग तोडण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये बंदर खमीरमधील पुलांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लगातार 6 व्या रात्री अमेरिकेचा मारा; चाबहार बंदराचेही मोठे नुकसान

अमेरिकन लष्कराच्या ‘सेंट्रल कमांड’ने दिलेल्या निवेदनानुसार, या ताज्या हवाई हल्ल्यांमध्ये डझनभर ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून, अमेरिकेच्या हल्ल्यांची ही सलग 6 वी रात्र होती आणि हे सत्र शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होते. इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘इरना’ (IRNA) च्या वृत्तानुसार, या भीषण बॉम्बफेकीदरम्यान ओमानच्या आखातावर असलेल्या इराणच्या रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ‘चाबहार बंदरा’वरील एक मोठा नियंत्रण टॉवर कोसळला. 

हेही वाचा – Rohingya Boat Tragedy: बंगालच्या उपसागरात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना; 2 बोटी बुडाल्या; 500 हून अधिक रोहिंग्यांना जलसमाधी

हे बंदर अफगाणिस्तानसारख्या भू-वेष्टित शेजारील देशासाठी व्यापाराचा मुख्य मार्ग मानले जाते. चाबहार बंदरावर अमेरिकन हवाई हल्ल्यांची ही 3 री फेरी असून, सुरुवातीला इराणने टॉवर कोसळल्याच्या वृत्ताला त्वरित दुजोरा दिला नव्हता. या टॉवरचा वापर बंदरातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जात होता, ज्यामुळे इराणच्या सागरी व्यापाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number