Henley Passport Index: जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टपैकी एक मानला जाणारा अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदाच हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या टॉप 10 यादीतून बाहेर पडला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या स्थापनेपासून अमेरिका सतत वरच्या पातळीवर होता, मात्र आता अमेरिकेचा पासपोर्ट 12 व्या स्थानावर पोहोचला असून मलेशियासह स्थान सामायिक करत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही घसरण जागतिक राजनैतिक कूटनीति आणि व्हिसा धोरणांमधील बदलांमुळे झाली आहे, ज्यामुळे अमेरिकन पासपोर्टची ताकद कमी झाली आहे.
अमेरिकन पासपोर्टचे रँकिंग कमी होण्याची कारणे
हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार अमेरिकन नागरिकांना 227 पैकी फक्त 180 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. मागील दशकात हे प्रमाण जास्त होते. ब्राझील, चीन, व्हिएतनामसारख्या देशांनी अमेरिकेच्या व्हिसा-मुक्त यादीतून नागरिकांना वगळले आहे. तसेच, पापुआ न्यू गिनी, म्यानमार आणि सोमालियात नवीन ई-व्हिसा प्रणालींमुळे अमेरिकन पासपोर्टची पोहोच आणखी मर्यादित झाली आहे. अमेरिकेच्या नागरिकांना 180 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश असला तरी अमेरिका फक्त 46 देशांच्या नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देते.
हेही वाचा - India-Mongolia Agreement: भारत-मंगोलिया संबंध अधिक दृढ! मंगोलियाच्या विकासात भारत विश्वासार्ह भागीदार; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान आणि चीनची प्रगती
सिंगापूरने 193 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशासह पहिले स्थान मिळवले आहे, तर दक्षिण कोरिया आणि जपान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चीनने 2015 मध्ये 94व्या क्रमांकावरून आपले स्थान सुधारून 64व्या स्थानावर निश्चित केले आहे. आता 82 देशांत त्यांचे व्हिसा-मुक्त प्रवास उपलब्ध आहेत. चीनने नुकताच रशियालाही आपल्या व्हिसा-मुक्त यादीत समाविष्ट केले. भारत 85व्या स्थानावर असून देशातील नागरिक 57 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात.
हेही वाचा - Donald Trump: भारतासह पाकिस्तानलाही ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची धमकी; म्हणाले 'टॅरिफच्या ताकदीवर...
परिणाम आणि जागतिक प्रतिक्रिया
अमेरिकन पासपोर्टची घटती ताकद आणि जागतिक अस्थिरतेमुळे अमेरिकन नागरिक दुसरे नागरिकत्व घेण्याची गरज जाणवत आहेत. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की जर अमेरिका आपले व्हिसा धोरण अधिक लवचिक केले नाही, तर पासपोर्टची जागतिक ताकद अजून कमी होऊ शकते. याउलट, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि चीन त्यांच्या खुले धोरण आणि राजनैतिक स्थिरतेमुळे जागतिक प्रवासात अधिक प्रभावी ठरत आहेत.