Tuesday, November 11, 2025 11:13:13 PM

Netanyahu On Trump: 'आम्ही युद्धासाठी मोठी किंमत मोजली, पण आता शत्रू...'; नेतान्याहू यांच्याकडून ट्रम्पचे कौतुक

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संबोधित करताना ट्रम्पच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, 'आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. तुमचे नाव इस्रायलच्या वारशात कोरले जाईल.

netanyahu on trump आम्ही युद्धासाठी मोठी किंमत मोजली पण आता शत्रू नेतान्याहू यांच्याकडून ट्रम्पचे कौतुक

Netanyahu On Trump: गाझा शांतता करारासाठी इस्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर देऊन सन्मानित करणार आहे. इस्रायली संसदेतील कार्यक्रमात ट्रम्प यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. संसदेचे सभापती अमीर ओहाना यांनी ट्रम्प यांना ज्यू इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून गौरवले. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संबोधित करताना ट्रम्पच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, 'आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. तुमचे नाव इस्रायलच्या वारशात कोरले जाईल. तसेच ते मानवतेच्या इतिहासातही कोरले गेले आहे. त्यांच्या भाषणावर संसदेतील सदस्यांनी "ट्रम्प! ट्रम्प!" असा जयघोष केला.

हेही वाचा - Indian Economy: अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का; मोदींनी आखला असा प्लॅन की भारत होईल मालामाल

नेतान्याहू यांनी सांगितले की, 'या युद्धासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली, परंतु आमच्या शत्रूंना आता समजले आहे की इस्रायल किती शक्तिशाली आणि दृढनिश्चयी आहे. त्यांनी (हमास) सर्व ओलिसांना घरी आणण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी ते पूर्ण केले आहे. मी शांततेसाठी वचनबद्ध आहे.'

हेही वाचा - Donald Trump On Gaza Ceasefire : 'मी सोडवलेलं हे आठवं युद्ध असेल'; गाझा युद्धबंदीवर ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान, नेतान्याहू यांनी ट्रम्पच्या सहाय्याबद्दलही बोलताना सांगितले, दोन महिन्यांपूर्वी गाझा शहरातील हमासच्या शेवटच्या बालेकिल्ल्यात आयडीएफ पाठवण्याच्या माझ्या निर्णयाला तुम्ही पूर्ण पाठिंबा दिला. या लष्करी दबावामुळे ओलिसांना मुक्त करण्यात मदत झाली. नेतान्याहूच्या या भाषणातून ट्रम्पच्या इस्रायलसाठी योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. 


सम्बन्धित सामग्री