Attacker Of Donald Trump: कोण आहे तो ज्याने ट्रम्प यांच्यावर रोखली बंदूक? अमेरिकेतील गोळीबाराची धक्कादायक ‘इनसाईड स्टोरी’

या चकमकीत एका सीक्रेट सर्व्हिस एजंटलाही गोळी लागली, मात्र त्याने परिधान केलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले.

Attacker Of Donald Trump: कोण आहे तो ज्याने ट्रम्प यांच्यावर रोखली बंदूक? अमेरिकेतील गोळीबाराची धक्कादायक ‘इनसाईड स्टोरी’

वॉशिंग्टनच्या प्रतिष्ठित 'व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर' कार्यक्रमात काल रात्री आनंदाचे वातावरण असताना अचानक गोळीबाराच्या आवाजाने सर्व काही विस्कळीत झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित असतानाच गोंधळ निर्माण करणारी घटना घडली. कार्यक्रमाच्या मुख्य सुरक्षा तपासणी केंद्राजवळ एका हल्लेखोराने अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि क्षणार्धात हसत्या-खेळत्या वातावरणाचे रूपांतर गंभीर स्वरूपात झाले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अमेरिकेचे दिग्गज मंत्री आणि अधिकारी टेबलखाली लपून बसले होते, हा थरार जागतिक लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा एका 31 वर्षीय माथेफिरूने वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराला सुरुवात केली. स्फोटांचे मोठे आवाज ऐकताच अमेरिकेच्या 'सीक्रेट सर्व्हिस'च्या एजंट्सनी जिवाची पर्वा न करता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने धाव घेतली. डोळ्याचे पाते लवण्यापूर्वीच एजंट्सनी ट्रम्प यांच्याभोवती मानवी कवच तयार केले. त्यांना सर्वात आधी जवळच्या टेबलखाली लपवण्यात आले आणि अत्यंत सुरक्षितपणे हॉलबाहेर काढले गेले. सुरक्षेच्या या अभेद्य भिंतीमुळे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, परंतु या घटनेने अमेरिकेच्या सर्वोच्च सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या चकमकीत एका सीक्रेट सर्व्हिस एजंटलाही गोळी लागली, मात्र त्याने परिधान केलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले. जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर देत हल्लेखोराला जमिनीवर दाबून धरले आणि त्यानंतर त्याला ठार करण्यात यश मिळवले. या भीषण हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा सर्वात कडक असते, तिथे हा हल्लेखोर इतक्या जवळ पोहोचलाच कसा, याचा सखोल तपास आता अमेरिकन तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

हेही वाचा: Delhi Airport Flight Fire : दिल्ली विमानतळावर एकच घबराट! टेक ऑफ घेण्यापूर्वीच विमानाला लागली आग; 6 प्रवासी जखमी तर लहान मुलांसह 228 प्रवासी…

आता या हल्लेखोराबद्दल अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, 31 वर्षीय हल्लेखोराची ओळख कोल ॲलन म्हणून पटली आहे. हा व्यक्ती कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असून व्यवसायाने तो एक 'शिक्षक' असल्याची माहिती मिळाल्याने सर्वजण थक्क झाले आहेत. ज्याच्या हातात पेन असायला हवा, त्याने राष्ट्राध्यक्षांवर रायफल का रोखली, हे कोडं अद्याप सुटलेलं नाही. एका केंद्रीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सूत्राने त्याच्या ओळखीची पुष्टी केली आहे, मात्र त्याच्या या हिंसक कृत्यामागील नेमका हेतू अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा वॉशिंग्टन डीसीचे पोलीस प्रमुख जेफ्री कॅरोल यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संशयित कोल ॲलन हा त्याच हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, जिथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. हॉटेलचा पाहुणा असल्याने त्याला कडेकोट सुरक्षा भेदून कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणापर्यंत पोहोचणे सोपे झाले. हीच सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी ठरली. सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या हल्ल्यामागे मोठी आंतरराष्ट्रीय साखळी आहे का, या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला आहे. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या उक्तीचा प्रत्यय काल ट्रम्प यांच्या बाबतीत आला असला तरी, या घटनेने जागतिक राजकारणाला हादरा दिला आहे.

हेही वाचा: Harbhajan Singh: भाजपमध्ये प्रवेश करताच घरावर लिहले'पंजाबचा गद्दार'; हरभजन सिंगचे टेंशन वाढणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number