Iran US War : ‘ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत युद्ध सुरू ठेवणार…’; इराणच्या IRGC चा अमेरिकेला गंभीर इशारा

पुढील राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सुरू होईपर्यंत हा संघर्ष असाच लांबवला जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.

Iran US War : ‘ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत युद्ध सुरू ठेवणार…’; इराणच्या IRGC चा अमेरिकेला गंभीर इशारा

Iran US War :  मध्य पूर्वेतील लष्करी आणि राजकीय तणाव अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत हे युद्ध चालू ठेवण्यास इराण पूर्णपणे सज्ज असल्याचे वक्तव्य इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे वरिष्ठ कमांडर मोहम्मद रझा नकदी यांनी दिले आहे. पुढील राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सुरू होईपर्यंत हा संघर्ष असाच लांबवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. भविष्यात कोणत्याही देशाने इराणवर लष्करी कारवाई करण्याचे धाडस करू नये, यासाठी शत्रूचे कधीही न भरून निघणारे अतोनात नुकसान धोरणात्मकरीत्या केले जाईल, असे नकदी यांनी ठामपणे नमूद केले.

होर्मुझ सामुद्रधुनी आणि नौदलाच्या नाकेबंदीवरून ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वक्तव्यात दावा केला आहे की, अतिशय मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अमेरिकन नौदलाची नाकेबंदी ही 1 'पोलादी भिंत' बनली असून इराण याविरुद्ध काहीही करू शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले. तसेच इराण सध्या तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांची लष्करी ताकद पूर्णपणे क्षीण झाली आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला. इराणच्या सैन्यदलांकडे, नौदलाकडे आणि हवाई दलाकडे पुरेशी संसाधने उरलेली नसून IRGC ची स्थिती खालावली असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा – Petrol Crisis : मोठ्या संकटाचा इशारा! 15 ऑगस्टपासून पेट्रोल पंप बंद होणार? अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम

दीर्घकालीन संघर्षाचे धोरण आणि इराणचा अंतिम हेतू

ट्रम्प यांच्या दाव्यांना फेटाळून लावताना कमांडर नकदी यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत इराणचे पारडे जड आहे, परंतु अजून अंतिम उद्दिष्ट साध्य झालेले नाही. शत्रूच्या मनात कायमस्वरूपी धाक निर्माण करणे हाच इराणचा मुख्य उद्देश आहे. युद्ध प्रदीर्घ काळासाठी लांबवून अमेरिकेला मोठी आर्थिक आणि लष्करी किंमत मोजायला लावणे हा या रणनीतीचा मुख्य भाग आहे. यामुळे भविष्यात इराणला आव्हान देण्यापूर्वी शत्रूला भीषण परिणामांचा विचार करावा लागेल, असा इशारा इराणी लष्करी नेतृत्वाने दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number