Strait of Hormuz Crisis: इंधन टंचाईचं संकट टळणार? ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ जहाजं LPG घेऊन भारताकडे रवाना; ‘या’ दिवशी पोहोचणार

या दोन्ही जहाजांवर एकूण 60 भारतीय खलाशी कार्यरत आहेत. यामध्ये 'जग वसंत'वर 33, तर 'पाइन गॅस'वर 27 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

Strait of Hormuz Crisis: इंधन टंचाईचं संकट टळणार? ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ जहाजं LPG घेऊन भारताकडे रवाना; ‘या’ दिवशी पोहोचणार

Strait of Hormuz Crisis: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 92,612.59 मेट्रिक टन एलपीजी (LPG) घेऊन येणारे 'जग वसंत' आणि 'पाइन गॅस' हे दोन भारतीय जहाजं अत्यंत धोकादायक मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) यशस्वीरित्या पार करून भारताच्या दिशेने झेपावले आहेत. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, ही जहाजे 26 ते 28 मार्च दरम्यान भारतीय बंदरांवर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

60 भारतीय खलाशांचे धाडस; सरकारकडून सतत देखरेख
या दोन्ही जहाजांवर एकूण 60 भारतीय खलाशी कार्यरत आहेत. यामध्ये 'जग वसंत'वर 33, तर 'पाइन गॅस'वर 27 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत या सागरी मार्गावरून प्रवास करणे आव्हानात्मक असतानाही, भारतीय नौदलाच्या आणि सरकारच्या समन्वयामुळे हे जहाजं सुरक्षित बाहेर पडले आहेत. यापूर्वी 'शिवालिक', 'नंदा देवी' आणि 'जग लाडकी' ही तीन जहाजेदेखील याच मार्गाने किंवा ओमानच्या आखातातून भारतात सुखरूप दाखल झाली आहेत.

पंतप्रधान मोदींकडून राज्यसभेत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही
'होर्मुझची सामुद्रधुनी' मधील संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाष्य केले. "होर्मुझमध्ये जहाजांना अटकाव करणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे," अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. पश्चिम आशियातील संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असला, तरी भारताची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने आपली ऊर्जेची आयात आता 27 वरून 41 देशांपर्यंत विस्तारली असून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सरकार दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प कधी काय बरळतील याचा नेम नाही; आता म्हणे ‘होर्मुजचे नियंत्रण मी आणि अयातुल्लाह मिळून सांभाळू’, इराणकडून मात्र…

भारताचा इंधन साठा आणि भविष्यातील नियोजन
पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आपल्या गरजेच्या 60 टक्के एलपीजी आयात करतो. सध्या देशाकडे 5.3 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोलियमचा साठा उपलब्ध असून, अतिरिक्त 6.5 दशलक्ष मेट्रिक टन साठा सुरक्षित करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. जागतिक परिस्थिती नाजूक असली तरी, भारताचा तेल आणि वायूचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सरकार संवेदनशीलपणे पावले उचलत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number