Sunday, July 13, 2025 11:06:56 AM

'आत्मसमर्पण' हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही.. इराणच्या अली खामेनींचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या धमकीला उत्तर देताना ते म्हणाले की, आत्मसमर्पण हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही.

आत्मसमर्पण हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही इराणच्या अली खामेनींचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर

तेहरान: इस्रायल-इराण युद्धानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात दावा केला की, इराणने इस्रायलविरोधातील युद्ध जिंकले आहे. इस्रायल-इराण युद्ध संपल्यानंतर गुरुवारी त्यांनी हे पहिलेच सार्वजनिक विधान केले. यादरम्यान त्यांनी दावा केला की, इराणने इस्रायलविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या धमकीलाही उत्तर दिले आहे. आत्मसमर्पण हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही, असे खामेनी यांनी म्हटले आहे. इस्रायली सैन्याने इराणवर बॉम्बस्फोट केल्यानंतर 12 दिवसांच्या युद्धादरम्यान खामेनी यांनी एका गुप्त ठिकाणी आश्रय घेतला होता. इस्रायलने खामेनींना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती, ज्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता.

खामेनी काय म्हणाले?
आयातुल्लाह खामेनी पुढे म्हणाले की, इराणी लोकांनी त्यांची एकता दाखवली. ते म्हणाले की, "ट्रम्प यांनी इराणला 'शरणागती पत्करण्याचे' आवाहन केले. परंतु, त्यांची म्हणजेच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या तोंडून येणारी विधाने त्यांच्या तोंडापेक्षा मोठी होती. (अमेरिका लहान तोंडी मोठा घास घेत आहे.)" "इराणसारख्या महान देश आणि राष्ट्रासाठी, आत्मसमर्पणाचा उल्लेख करणे हाच अपमान आहे," असे खामेनी म्हणाले. ते म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकून एक सत्य उघड केले - की, अमेरिका सुरुवातीपासूनच इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा विरोध करत आहेत. (इराण या 'इस्लामी संप्रदाय' असलेल्या राष्ट्राच्या विरोधात आहे.)

हेही वाचा - बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स काय असतात? यांचाच वापर करून अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केले

त्यांनी ट्रम्पवर मोठा आरोप केला
त्यांच्या विधानात, आयातुल्लाह खामेनी म्हणाले की, "इराणच्या अणु कार्यक्रमावर हल्ला करून अमेरिका "काहीही महत्त्वाचे साध्य करण्यात अयशस्वी" झाली. ते म्हणाले की, जे घडले होते, त्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अतिशयोक्तीपूर्ण वर्णन' केले आहे." खामेनी म्हणाले की, त्यांना असे करण्याची आवश्यकता आहे हे स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले की, ऐकणारे कोणीही म्हणू शकतात की, अमेरिका सत्य विकृत करण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी करत आहे. ते म्हणाले की, आम्ही या प्रदेशातील अमेरिकेच्या मुख्य तळांपैकी एकावर हल्ला केला आणि येथे त्यांनी ते कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.

युद्ध जिंकल्याबद्दल इराणचे अभिनंदन
खामेनींनी एक्सवरील एका पोस्टमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या देशाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की "आमच्या प्रिय इराणचा अमेरिकन राजवटीवर विजय." खामेनी म्हणाले की, अमेरिकेने "थेट युद्धात प्रवेश केला. कारण त्यांना वाटले की, जर त्यांनी असे केले नाही तर, झिओनिस्ट राजवट पूर्णपणे नष्ट होईल." खामेनी यांनी असा दावा केला की, अमेरिकेला "या युद्धातून काहीही साध्य झाले नाही" आणि ते म्हणाले की, इराण "विजयी" होऊ शकला आणि त्यांनी "अमेरिकेच्या तोंडावर जोरदार थप्पड मारली."

हेही वाचा - US Airstrikes Iran: अमेरिकेचे इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले; नेतन्याहू म्हणाले, ‘अभिनंदन ट्रम्प..’


सम्बन्धित सामग्री