मोठी बातमी! जगात तिसऱ्या युद्धाचा भडका; 24 तासांत तब्बल 1900 हून अधिक भीषण हल्ले, सौदीच्या मदतीने..

रशिया-युक्रेन, अमेरिका-इराण या दोन मोठ्या युद्धांच्या भीषण सावटाखालीच आता जगात तिसऱ्या युद्धाचा भडका उडाला आहे.

मोठी बातमी! जगात तिसऱ्या युद्धाचा भडका; 24 तासांत तब्बल 1900 हून अधिक भीषण हल्ले, सौदीच्या मदतीने..
war

Yemen War against Houthi Rebels 2026: एकीकडे गेल्या 5 वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू असून अमेरिकेच्या मध्यस्थीनंतरही त्यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. दुसरीकडे 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले असून आखातातील अमेरिकन सैन्यतळांवरही प्रतिहल्ले होत आहेत. या दोन मोठ्या युद्धांच्या भीषण सावटाखालीच आता जगात तिसऱ्या युद्धाचा भडका उडाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढलेला असतानाच येमेन सरकारने सौदी अरेबियाच्या मदतीने हौथी बंडखोरांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी मोहीम उघडली आहे.

सौदी अरेबियाची एअर स्ट्राईकमध्ये मदत
येमेन सैन्याने सौदी अरेबियाच्या हवाई दलाच्या (Air Strike) सहाय्याने हौथी बंडखोरांच्या विविध ठिकाणांवर अत्यंत आक्रमक हल्ले चढवले आहेत. येमेन सरकारच्या अधिकृत दाव्यानुसार, गेल्या 24 तासांच्या कालावधीत हौथींच्या ताब्यात असलेल्या सर्व रणनीतिक ठिकाणांवर तब्बल 1,900 पेक्षा जास्त तीव्र हल्ले करण्यात आले आहेत. या अत्यंत भीषण कारवाईत सुमारे 1,150 हून अधिक हौथी बंडखोर मारले गेले असून त्यांचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या दणक्यामुळे हौथींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – अमेरिकेला इराणकडून मोठा दणका! होर्मुज खाडीतील स्फोटात 20 लाख बॅरल्स तेलवाहू जहाज भस्मसात; जागतिक तेलाचा पुरवठा धोक्यात

बाब-अल-मंदेब परिसरात घनघोर युद्ध; येमेन सैन्याकडून हौथींचे शस्त्रभंडार जप्त
हौथी बंडखोरांनी या भीषण कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असला तरी या संघर्षात सध्या येमेनचे सैन्य पूर्णपणे वरचढ ठरताना दिसत आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बाब-अल-मंदेब (Bab-al-Mandeb) स्ट्रेट परिसरात दोन्ही बाजूंकडून तुफान युद्ध सुरू आहे. येमेन सैन्याने हौथींचा मोठा शस्त्रसाठा आणि लष्करी भांडार आपल्या ताब्यात घेतले असून, त्यांना बाहेरून मिळणारी रसद आणि पुरवठ्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे हौथींची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे.

हौथींनी कब्जा केलेले प्रदेश येमेनच्या ताब्यात
येमेन सरकारच्या लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, येमेनचे सैन्य वेगाने पुढे जात असून हौथींचे वर्चस्व असलेले अनेक भाग पुन्हा एकदा मुक्त करण्यात आले आहेत. दीर्घकाळापासून हौथींच्या बेकायदेशीर कब्जाखाली असलेले रणनीतिक प्रदेश येमेनच्या सैन्याने पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतले आहेत. अमेरिका, रशिया, इराण आणि आता येमेन-हौथी यांच्यातील या वाढत्या संघर्षांमुळे संपूर्ण जगाची चिंता कमालीची वाढली आहे.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण हल्ला; 12 जण ठार तर 300 हून अधिक जण गंभीर जखमी

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number