Wednesday, May 15, 2024 02:54:42 PM

कांदा निर्यातीला परवानगी

कांदा निर्यातीला परवानगी

नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी कांदा निर्यातील बंदी केली होती. ही बंदी आता मर्यादीत प्रमाणात मागे घेण्यात आली आहे. देशातून ९९ हजार १५० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेश, यूएई, भूतान, बहारिन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात करता येईल. याआधी सरकारने मध्य-पूर्व आणि काही युरोपीय देशांमध्ये दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. या निर्णयांचा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. कांद्याच्या शेतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे तर पांढऱ्या कांद्याच्या शेतीत गुजरात आघाडीवर आहे.


सम्बन्धित सामग्री






Live TV