Friday, May 24, 2024 09:40:22 AM

Mumbai hoarding collapse
मुंबईत जाहिरात फलक कोसळून १४ ठार

घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असलेला अनधिकृत जाहिरात फलक कोसळला. या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत जाहिरात फलक कोसळून १४ ठार

मुंबई, १४ मे २०२४, प्रतिनिधी : घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असलेला अनधिकृत जाहिरात फलक कोसळला. या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झाला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्याने यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी भाजपाचे आमदार राम कदम यांनी उद्धव आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश भिंडे याचा एक फोटो ट्विट केला. हा फोटो ट्विट करत राम कदम यांनी या दुर्घटनेसाठी उद्धव यांना जबाबदार धरले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनीही पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन उद्धव यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 


सम्बन्धित सामग्री