Sunday, May 19, 2024 04:54:53 AM

उत्तर मध्य मुंबईतून उज्जल निकमांना भाजपाचे तिकीट

उत्तर मध्य मुंबईतून उज्जल निकमांना भाजपाचे तिकीट

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाने विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पूनम महाजन यांचे तिकीट कापण्यात आले आहे. याआधी काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेले विधीज्ञ उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम ?

उज्ज्वल निकम भारत सरकारचे आणि महाराष्ट्र शासनाचे माजी विशेष वकील
दहशतवाद, हत्या, बलात्काराशी संबंधित महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू समर्थपणे मांडली
आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मुद्देसूद आणि प्रभावी युक्तीवाद
आरोपींपैकी काहींना माफीचे साक्षीदार करून जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा होईल यासाठी युक्तिवाद करणे हे निकमांच्या कामाचे वैशिष्ट्य
पद्मश्री पुरस्कार विजेते उज्ज्वल निकम - २०१६
निकमांना झेड प्लस संरक्षण
संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादावरील जागतिक अधिवेशनात भारत सरकारचे प्रतिनिधित्व - २०१०

उज्ज्वल निकमांनी हाताळलेले महत्त्वाचे खटले

कल्याण बॉम्बस्फोट - १९९१
मुंबईतला बॉम्बस्फोट खटला - १९९३
गुलशन कुमार हत्या प्रकरण - १९९७
गेट वे ऑफ इंडिया बॉम्बस्फोट - २००३
प्रमोद महाजन हत्या प्रकरण - २००६
खैरलांजी हत्याकांड - २००६
मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याचा खटला - २६ नोव्हेंबर २००८
मुंबईतला सामूहिक बलात्कार - २०१३
पल्लवी पुरकायस्थची हत्या - २०१३
प्रीती राठी हत्या - २०१३
मोहसीन शेख हत्या - २०१४
कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा खटला - २०१६
डेव्हिड हेडली खटला - २०१६


सम्बन्धित सामग्री