सातारा हादरलं! मुलीचं वागणं खटकलं, वडील आणि चुलत्यानं रागाच्या भरात लेकीलाच संपवलं; दोन्ही आरोपी अटकेत

साताऱ्यात वर्तणूक चुकीच्या असल्याच्या रागातून 19 वर्षीय हर्षदाचा वडील आणि चुलत्याकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सातारा हादरलं! मुलीचं वागणं खटकलं, वडील आणि चुलत्यानं रागाच्या भरात लेकीलाच संपवलं; दोन्ही आरोपी अटकेत
satara crime

सातारा : साताऱ्यात कौटुंबिक वादातून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याच्या कारणातून वडील आणि चुलत्याने तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मृत तरुणीचे नाव हर्षदा असून ती मूळची सोलापूर जिल्ह्यातील आहे. लहानपणापासूनच हर्षदाला मित्र-मैत्रिणींच्या संगतीची आवड होती. मात्र, तिच्या वागण्यावरून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हर्षदा पुण्यात शिक्षण घेत होती. ती रोज सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून रात्री आठ वाजता घरी परतत असे. तिच्या या दिनक्रमावरून वडील आणि मुलीमध्ये अनेकदा वाद होत होते. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यास ती घरातून बाहेर जाण्याची धमकी द्यायची. या सततच्या वादातून हर्षदाच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिचे वागणे कायमचे थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी मिळून हर्षदाचे तोंड आणि नाक दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या याप्रकरणी मुलीचे वडील आणि चुलते या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामकर यांनी दिली.

हेही वाचा : दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना काळाचा घाला! समृद्धी महामार्गावर ट्रक-टेम्पो ट्रॅव्हल्सची भीषण धडक; 7 ठार, 18 गंभीर

दरम्यान, हर्षदाच्या वागण्याबाबत कुटुंबात मतभेद असले तरी तिच्यावर अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने या घटनेची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. घरातील वाद, मुलीच्या स्वातंत्र्याबाबतचे मतभेद आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या वागण्यावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर तिच्या मृत्यूपर्यंत पोहोचला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या खून प्रकरणात फक्त एवढीच कारणे आहेत की अजून काही वेगळी कारणे आहेत का, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number