नाशिक हादरलं! दिल्लीहून सुट्टीसाठी गावी आला अन् धरणात बुडाल्याने जीव गमावला; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात 25 वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
waghdardi dam manmad
waghdardi dam manmad

नाशिक : मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात 25 वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून राहुल सोमासे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. गरीब कुटुंबातील असलेल्या या तरुणाचे शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो दिल्लीत जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. दसरा साजरा करण्यासाठी हा तरुण सुट्टी घेऊन घरी आल्यानंतर त्याचे चुलते यांनी बैल आजारी असल्याने त्याला पाण्यात पोहण्यासाठी घेऊन जाण्याकरिता सांगितले. त्यानंतर आपल्या चुलत भावासोबत राहुल वागदर्डी धरणावर गेला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलाला पाण्यात पोहण्यासाठी नेत असताना राहुलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात शोककळा पसरली असून पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा : दुर्दैवी घटना! जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; 3 तरुणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version