Girls Inside Madrasa bathroom : भयंकर! मदरशाच्या बाथरुममध्ये सापडल्या 40 मुली, तपासाअंती जे समोर आलं हे पाहून पोलिसही झाले अवाक्

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील पयागपूर भागात एका बेकायदेशीर मदरशाचं प्रकरण समोर आलं आहे. पहेलवाडा चौकातील एका तीन मजली इमारतीत वर्षानुवर्षे परवानगीशिवाय हा मदरसा सुरू होता.

Girls Inside Madrasa bathroom : भयंकर! मदरशाच्या बाथरुममध्ये सापडल्या 40 मुली, तपासाअंती जे समोर आलं हे पाहून पोलिसही झाले अवाक्

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील पयागपूर भागात एका बेकायदेशीर मदरशाचं प्रकरण समोर आलं आहे. पहेलवाडा चौकातील एका तीन मजली इमारतीत वर्षानुवर्षे परवानगीशिवाय हा मदरसा सुरू होता. पोलिसांनी तिथून अंदाजे 40 अल्पवयीन मुलींना बाहेर काढलं. स्थानिक प्रशासनाला ही माहिती मिळाल्यानंतर एसडीएम आणि पोलीस पथकाने मदरशावर छापा टाकला. 

सुरुवातीला एसडीएम तिथे आले. मात्र मदरसा संचालकाने गेट उघडण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर एसडीएमने पयागपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना बोलावलं. यानंतर मदरशाचा गेट उघडला, एसडीएम आणि पोलिसांनी मदरशात प्रवेश केला. मदरशाची तपासणी केली. बाथरुम उघडलं आणि तिथून एकएक करत 40 अल्पवयीन मुली बाहेर पडल्या. 

पोलीस मदरशात आले, तेव्हा मदरसा संचालकाने अल्पवयीन मुलींना बाथरुममध्ये बंद केलं होतं.   पोलिसांनी तात्काळ चौकशी करत मुलींना बाहेर काढलं आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली. विद्यार्थिनी बहराइचमधील विविध जिल्ह्यांतील रहिवासी होत्या. सर्व मुली त्यांच्या घरून मदरशात शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या असं तपासात समोर आलं. 

हेही वाचा: Swami Chaitanyananda : मुलींच्या वसतिगृहात गुप्त कॅमेरा, रात्री रुममध्ये बोलवून…, स्वामी चैतन्यानंदच्या कुकृत्यामध्ये कर्मचाऱ्यांचाही सहभाग

मदरसा गुप्तपणे सुरु होता. समोर एक दुकान आणि त्या मागे तीन मजली इमारत होती. कोणालाही संशय येऊ नये, अशा पद्धतीने मदरसा चालत होता. मदरशाची ओळख सर्वांपासून लपवून ठेवण्यात आली होती. ही एक युक्ती होती. मात्र स्थानिक प्रशासनाला परिस्थिती समजल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाई केली. 

सध्या मदरशातील मुली त्यांच्या घरी परतल्या आहेत. एसडीएमची टीम आता मदरशाच्या जागेची पाहणी करत आहे. जागा कशी वापरली जात होती आणि भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया रोखण्यासाठी ही तपासणी केली जात आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल डीएमला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर मदरशांबद्दलची चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणासाठी योग्य व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

मदरसा संचालकाकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. वैध कागदपत्रांच्या अभावामुळे मदरसा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मदरशांना मोठ्या प्रमाणात बाह्य निधी मिळत असल्याचा संशय असल्याने मदरशाच्या निधीचा स्रोत निश्चित करण्यासाठी देखील चौकशी सुरू असल्याचे एसडीएमने सांगितले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number