आई पाणी भरण्यासाठी घरी गेली, मैत्रिणीने गोड बोलून नेलं, तोंड दाबलं अन्.., 2 नराधमांनी आळीपाळीने केला अत्याचार; जळगाव हादरलं

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये विकृतीचा कळस पाहायला मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jalgaon Crime
Jalgaon Crime

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावमध्ये विकृतीचा कळस पाहायला मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुकर्मात पीडित मुलीची मैत्रीण देखील सामील होती. मैत्रिणीच्या मदतीने मुलीला महिला स्वच्छतागृहात नेण्यात आले आणि त्यानंतर दोन्ही तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

समोर आलेल्या माहितीनुसरा, आईसोबत कामाच्या ठिकाणी गेलेल्या मुलीवर आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून दोन तरुणांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी महिला स्वच्छतागृहात येताच आरोपी राहुल याने पीडितेवर अत्याचार केला. यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात केली असता 16 वर्षीय अल्पवयीन आरोपी मुलीने पीडितेचं तोंड दाबून तिचे हात पकडले.

हेही वाचा- Mumbai Manhole Accident : मोठी बातमी! मुंबईत मॅनहोलमध्ये आणखी एकाचा बळी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

त्यानंतर आरोपी आर्य यानेही पीडितेवर अत्याचार केला.या घटनेत पीडितेच्या 16 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीनेही आरोपींना मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय आणि मानसिक आधार देण्याबरोबरच तिच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version