अंगात भूत शिरल्याचा बनाव करून शाळकरी मुलीवर अत्याचार! बाहुली, लिंबू अन् चामडी गोफणीने…; सातारा हादरलं

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Satara Crime
Satara Crime

प्रकाश शिंदे, सातारा | सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फलटण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अंगात भूत शिरल्याची बतावणी करत जादूटोणा करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा- अफेअरचा राग डोक्यात गेला! प्रियकरासह पत्नीला पकडलं अन् सर्वांसमोर ते करायला लावलं; 9 जणांना अटक

याप्रकरणी संशयित आरोपी सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पीडितेच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करून अघोरी विधी केले असून त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात पोस्को कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून फास्टट्रॅक कोर्टात हा गुना चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version