खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, तोतया पोलिसाच्या सततच्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात फेक पोलीस अधिकाऱ्याच्या धमकीमुळे अ‍ॅक्सेंचरमध्ये काम करणाऱ्या एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Pune Crime
Pune Crime

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात फेक पोलीस अधिकाऱ्याच्या धमकीमुळे अ‍ॅक्सेंचरमध्ये काम करणाऱ्या एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी संशयित तोतया पोलीसाने तरुणाला ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिखर सक्सेना (वय 22) असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. हडपसरमधील मगरपट्टा सिटी येथे अ‍ॅक्सेंचर कंपनीत कार्यरत असलेला शिखर पुण्यातील खराडी परिसरात पीजीमध्ये शिखर राहत होता. यावेळी त्याला एका फेक पोलीसांची ‘ड्रग्ज पार्सल’ प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी धमकावल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा- खळबळजनक! पतीने आवळला पत्नीचा गळा; नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल, कंपनीला ई-मेल पाठवून दिली माहिती

धमक्यांनंतर शिखरला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये अनेक ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून 1 ऑक्टोबरच्या पहाटे उंच इमारतीवरून उडी घेत शिखरने जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

वडील कुमारगौरव सक्सेना यांच्या तक्रारीनंतर खराडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी आणि धमकी देण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हेगारांच्या सहभागाचा पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान शिखरच्या मृत्यूप्रकरणी वडिलांकडून न्यायाची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version