Nanded Crime Aanchal Mamidwar: प्रेमासाठी मृतदेहाशी लग्न करणारी आंचल गेली घरातून निघून; सासऱ्याचा मृत्यू, सासूने सांगितलं, "साडेतीन महिने आमच्यासोबत राहिली आणि अचानक…"

नांदेडच्या सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली असून तिच्यासोबत ताटे कुटुंबीयांचा कोणताही संपर्क नसल्याचे देखील समोर आले आहे.

Nanded Crime Aanchal Mamidwar: प्रेमासाठी मृतदेहाशी लग्न करणारी आंचल गेली घरातून निघून; सासऱ्याचा मृत्यू, सासूने सांगितलं, &quotसाडेतीन महिने आमच्यासोबत राहिली आणि अचानक…&quot

सहा महिन्यांपूर्वी नांदेडच्या इतवारा परिसरात सक्षम ताटे या तरुणाची प्रेम प्रकरणातून त्याच्याच प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली होती. आंचल मामीडवार आणि सक्षम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र जात वेगळी असल्यामुळे मामीडवार कुटुंबीयांनी सक्षम ताटेसोबतच्या संबंधाला नकार दिला होता.

इतकचं नव्हे तर सक्षमला गोळ्या घालून आणि त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाची हळद लावत सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केले. तसेच आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. 

हेही वाचा- Pranit More Controversy : एक वाद संपत नाही तोच दुसरा पेटला! बिर्याणीनंतर MBBS विद्यार्थिनीचा पुरुष मृतदेहाच्या खाजगी अवयवांवरील टिप्पणी व्हायरल

यासंपूर्ण प्रकरणानंतर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली असून तिच्यासोबत ताटे कुटुंबीयांचा कोणताही संपर्क नसल्याचे देखील समोर आले आहे. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अनेक वाईट घटनांचा सामना करावा लागला.

सक्षमच्या वडिलांना त्याच्या मृत्यूचा इतका जास्त धक्का बसला की, त्यांचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. ज्यामुळे सक्षमची आई पुर्णपणे एकटी पडली होती. अशातच आंचल त्यांचा सहारा होती मात्र ती देखील आता घरातून निघून गेली आहे. त्यामुळे एकट्या पडलेल्या सक्षम ताटेच्या आईची अवस्था वाईट झाली आहे.

हेही वाचा- FDA Raid News : FDA ची मोठी कारवाई! 27 ठिकाणांवरील छापेमारीत 9 एफआयआर दाखल, 9 जणांना अटक; तर 6 आस्थापनांना टाळं

सक्षमची आई संगीता ताटे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, "सक्षमची हत्या झाली त्यावेळी आंचल म्हणाली होती की, मम्मी सक्षमची जागा मी घेईन, आता मी तुमचा मुलगा आहे. तुमच्यासोबतच राहीन. तुमची काळजी घेईन. ती साडेतीन महिने सोबत राहिली, आणि अचानक ती म्हणाली की, तिच्या आजीची तब्येत खूप खराब झाली आहे. मला तिला भेटायला जायचे आहे. मी तिला पोहोचवून आले. पण त्यानंतर ती परत आलीच नाही".

"आजीकडे जाण्यापूर्वी आंचल सोशल मीडियावर आपल्या काकांच्या संपर्कात होती. ती काय बोलायची? कुणाशी बोलायची? यावर आम्ही काहीही बंधनं ठेवली नव्हती. पण त्यानंतर ती घरी निघून गेली आणि परत आली नाही. सध्या आंचलसोबत कोणताही संपर्क नाही. यानंतर सक्षमच्या वडिलांची देखील प्रकृती ढासळत गेली. त्यांना बीपीचा त्रास होत होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं." असं सक्षमची आई संगिता ताटे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number