अंबरनाथ : येथे भरदिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ सोमवारी (ता. ३) दुपारी ही घटना घडली. या हत्येने शहरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी राहुल भिंगारकर यास काही तासांतच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
👉👉 हे देखील वाचा : बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस; विकास प्रकल्पांसह संतोष देशमुख प्रकरणाची चर्चा होणार?
मृत महिलेचे नाव सीमा कांबळे (वय ४२) असून, त्या शिवमंदिर परिसरातील बारकुपाडा येथे राहत होत्या. आरोपी राहुल भिंगारकर हा देखील त्याच भागातील रहिवासी आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा कांबळे यांनी राहुलला काही पैसे दिले होते. मात्र, राहुल पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता.
सोमवारी दोघे पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्यात वाद झाले. या वादातून संतप्त झालेल्या राहुलने सीमावर चाकूने हल्ला करत तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच शिवाजी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ तपास सुरू केला.काही तासांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील अटकेची कारवाई सुरू आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.