अल्पवयीन मुलीची प्रसूती, नवजात बाळाच्या विक्रीचा संशय; महिला डॉक्टर आणि अल्पवयीन प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

अमरावतीत अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. महिला डॉक्टर, तिचा पती आणि अल्पवयीन प्रियकराविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

अल्पवयीन मुलीची प्रसूती, नवजात बाळाच्या विक्रीचा संशय; महिला डॉक्टर आणि अल्पवयीन प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
Amravati News

अमरावतीमध्ये नवजात बाळाच्या कथित विक्रीप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिच्या बाळाची 3 लाख 50 हजार रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिला डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर, तिचा पती आणि अल्पवयीन मुलीचा प्रियकर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर महिला डॉक्टर आणि तिचा पती फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलीस विविध बाबींची चौकशी करत आहेत.

शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुख वर्षा भोयर आणि युवती सेना प्रमुख कोमल बद्रे यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याची माहिती आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये चर्चेला उधाण आले असून, नवजात बाळाच्या कथित विक्रीच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारी महिला डॉक्टरसोबतच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील संभाषणाची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. जय महाराष्ट्र न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number