आंध्र प्रदेशातील एन.टी.आर. जिल्हातील एका कॅनालमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची अतिशय खळबळजनक घटना समोर आलेली आहे. महिलेचा मृतदेह मिळताच पोलिसांनी या हत्येच्या दिशेने तपास सुरु केला.
घडलं काय?
18 सप्टेंबर 2026 रोजी इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या हद्दीतीतील कॅनालमध्ये या महिलेचा मृतदेहा हा छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था पाहता सुरुवातीला तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरले होते. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता महिलांशी संबंधित प्रकरणांची माहिती तपासत अखेर मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिला ही गुंटूर जिल्ह्यातील मंगलागिरी येथे वास्तव्यास असलेल्या कल्याणी ऊर्फ दुर्गा असल्याचे समोर आले असून ही मृत महिला पती आणि कुटुंबापासून एकटी राहत होती.
हेही वाचा-15 वर्षे भावाला राखी, आता त्याचीच झाली बायको; वडिलांबाबत धक्कादायक माहिती समोर
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वियवाड्यातील भवानीपुरम परिसरात मटणाचे दुकान चालवणाऱ्या शफी नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते. 17 सप्टेंबर रोजी कल्याणी आणि शफी यांच्या भांडण झालं होतं. कल्याणी ही वारंवार शफीकडे पैशांची मागणी करत होती. शिवाय छोट्या सोन्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठीही तिने शफीकडे पैसे मागितल्याचे समोर येत आहे. यापूर्वी दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाले होते. याच वादानंतर कल्याणीची शफीकडून हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
कल्याणीच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करत ते कूलिंग कॅनालमध्ये फेकले होते. तपासादरम्यान, पोलिसांनी कल्याणीच्या मोबाईल फोनच्या गेल्या काही दिवसांतील कॉल डिटेलसची देखली तपासणी केली. त्याच आधारे शफीसह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शफी हा विजयवाड्यातील भवानीपुरमध्ये राहत असून मटणाचे दुकाना चालवतो. कल्याणीच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार हे शफीच्या दुकानात मटण कापण्यासाठी वापरला जाणारा चाकूच होता. या प्रकरणात शफीला अब्दुल्ला आणि दुर्गा राव यांनी मदत केली. दुर्गा हा शफीचा मित्र असून त्याच्या व्यवसायाताही मदत करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात यांच्याशिवाय आणखी काही जणांचा सहभाग असल्याच्या चर्चा तपासादरम्यान समोर आलेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी अनेक शक्यता तपासल्या असता, त्यांचा या हत्येशी संबंध नसल्याचे समोर आले आहे. सध्या शफी, अब्दुल्ला आणि दुर्गा या तिघांची पोलीस चौकशी सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही हत्या कशा प्रकारे झाली, त्यामागील नेमके कारण काय होते शिवाय तिघांची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.