15 वर्षे भावाला राखी, आता त्याचीच झाली बायको; वडिलांबाबत धक्कादायक माहिती समोर

Intercaste Love Marriage Incident : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये या घडलेल्या एका घटनेने हे नातंच कायमचं मोडून टाकलं आहे आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

15 वर्षे भावाला राखी, आता त्याचीच झाली बायको; वडिलांबाबत धक्कादायक माहिती समोर
ज्या हातावर राखी बांधली, त्याच्याशीच सात फेरे

रक्षाबंधन म्हणजे भावाच्या रक्षणाचं प्रतीक मानलं जातं. एका धाग्यात कायमचं नातं गुंफल जातं. पण उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये या घडलेल्या एका घटनेने हे नातंच कायमचं मोडून टाकलं आहे आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

राखीचं नातं ते प्रेमसंबंध
प्रयागराजमधील यमुनानगर येथील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या गणेश यांची 20 वर्षीय मुलगी गेल्या 15 वर्षांपासून शेजारी राहत असलेल्या शाश्वत नावाच्या तरुणाला राखी बांधत होती. गावात सर्वजण त्यांना भाऊ-बहीणच मानत होते. शाश्वातचं देखील त्यांच्या घरी कायमच येणं-जाणं होतं. शाश्वात हा सध्या एलएलबीचं शिक्षण घेत असून त्याचे वडील हे वीज विभागात नोकरीला आहेत. पण याच भावाबहिणीच्या नात्याला सध्या वेगळंच वळण लागलेलं आहे. दोघांच्याही कुटुंबाला याची जराही कल्पना नव्हती की यांच्यामध्ये कधी प्रेम निर्माण झालं.

हेही वाचा-बीडमधील धक्कादायक घटना! पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून तीन विद्यार्थी अचानक बेपत्ता; रात्रीच्या जेवणानंतर…

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,20 सप्टेंबर रोजी दोघेही अचानक घरातून निघून गेले आणि थेट आंतरजातीय लग्न केले. यांच्या लग्नाची बातमी दुसऱ्या दिवशी वडील गणेश यांना समजून गेली आणि त्यांच्या पायाखालजी जमीनच सरकली. दु:खाच्या भरात आणि संतापात त्यांनी मुलीला मृत मानून तिचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले. 22 सप्टेंबरला तर तरुणीच्या पुण्यतिथीचाही विधी पार पडला. दुसरीकडे मुलीने एक व्हिडिओ बनवत सांगितले की, ”आम्ही दोघं एकमेंकाना पसंत करतो, आम्ही आमच्या इच्छेने लग्न केलं आहे.

एवढेचं नव्हे तर शाश्वत आता माझा पती आहे आणि मी त्याच्यासोबत आनंदी देखील आहे, तसेच कुटुंबीय आणि इतरांनी आपल्याला त्रास देऊ नये, ”असं तरुणीनं व्हिडिओत म्हटलं आहे.

हेही वाचा-पालघरमध्ये थरारक घटना! प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणाचा टोकाचा निर्णय; पोलिसांमुळे वाचला जीव

वडिलांबाबत समोर आली धक्कादायक माहिती
तरुणीने तिच्या वडिलांवर गंभीर आरोपही केले आहेत. वडील मारहाण आणि मानसिक त्रास द्यायचे, आजारी असताना देखील उपचार केले नाहीत, पण आता पती आणि सासरचे कुटुंब माझी काळजी घेत आहेत, असा दावा तिने केलाय. धक्कादाक म्हणजे घरातून तब्बल 2 लाख रुपये घेऊन गेल्याचा आरोपही तिने फेटाळला आहे, तर तरुणीच्या आईनं म्हटलं आहे की, शाश्वतने मुलीला भुलवून पळवून नेलं आहे. 15 वर्ष राखी बांधत असलेल्या भावानेच विश्वासघात केल्याची भावना कुटुंब सध्या व्यक्त करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number