Ashok Kharat case : ‘महिलेला खरातकडे नेऊन इच्छे विरुद्ध लिंबू फिरवला, गुंगीचे औषध देऊन…’ ठाण्यातील माजी उच्चअधिकारी निघाला खरातचा भक्त

खरातविरोधात आता ईडीची देखील एन्ट्री झाली असून नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातचे आता ठाणे कनेक्शन समोर आले आहे.

Ashok Kharat case : ‘महिलेला खरातकडे नेऊन इच्छे विरुद्ध लिंबू फिरवला, गुंगीचे औषध देऊन…’ ठाण्यातील माजी उच्चअधिकारी निघाला खरातचा भक्त

नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता कायदेशीर प्रक्रियेत नवे वळण मिळाले आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातला न्यायालयाने पुन्हा एकदा 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातला मिळालेली ही तिसरी न्यायालयीन कोठडी असून, यामुळे त्याच्यावरील तपासाचा फास अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. खरातविरोधात आता ईडीची देखील एन्ट्री झाली असून नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातचे आता ठाणे कनेक्शन समोर आले आहे. अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबतचे संबंध असल्याचे दावे-आरोप झाले आहेत. 

हेही वाचा- Paratwada Case: मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या अयानचं आणखी एक काळं कृत्य उघड; आईचे दागिने चोरले अन्…
⁠ठाण्यातील एक माजी अधिकारी अशोक खरातच्या होता अशी माहिती समोर आली आहे. महेश अहेर नावाचा वादग्रस्त अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होता, इतकंच नव्हे तर महेश अहेर अशोक खरातचा भक्त देखील होता. महेश अहेरने ठाणे महापालिकेतील एका लिपिक महिलेला अशोक खरातकडे नेले होते. महेश अहेर याने त्या महिलेला अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयात नेले होते.

महिलेच्या इच्छे विरोधात महेश अहेर आणि अशोक खरातने त्या महिलेवरुन लिंबू फिरवला आणि तिला मोती हा खडा घालायला दिला. संबंधित महिलेला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन जबरदस्ती शरीर संबंध करुन तिचा व्हिडीओ बनवून आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्ती शरीर संबंध ठेवल्याची तक्रार महिलेने महेश अहेर विरुद्ध केली आहे.  याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ठाणे क्राइम ब्रांच करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number