आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू! नातेवाईकांचं कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; शिक्षकांवर गंभीर आरोप

भिवंडीतील पिसे आदिवासी आश्रमशाळेतून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू! नातेवाईकांचं कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; शिक्षकांवर गंभीर आरोप

भिवंडीतील पिसे आदिवासी आश्रमशाळेतून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 11 वर्षीय विवेक भोये या चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि आदिवासी संघटनांनी शहापूर येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

भिवंडी तालुक्यातील पिसे येथील आदिवासी आश्रम शाळेत शिकत असलेल्या विवेक सुभाष भोये, इयत्ता पाचवी, वय वर्ष 11 या विद्यार्थ्याचा शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिसे आश्रम शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या चिमुकल्या बालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवून तेथील शिक्षक फरार झाले असल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर न्याय मागण्यासाठी सर्व नातेवाईक आदिवासी प्रकल्प कार्यालयात गेले असता कार्यालयात कोणताही अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे नातेवाईक आणि आदिवासी संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात हृदयद्रावक घटना! पायाला लोखंडी साखळी अन् कुलूप लावून नवविवाहित दांपत्याची तापी नदीत उडी

नातेवाईकांनी शहापूर प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त कुटुंब व नातेवाईक करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version