प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या! बंगळुरूतील आंदोलनात सहभागानंतर माजी IPS अधिकाऱ्याचे गृहमंत्रालयाला पत्र

08 ऑक्टोबर 2026 रोजी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि इतर नागरी संघटनांतर्फे आयोजित एसआयआर (SIR) प्रक्रियेविरोधातील आंदोलनात ध्रुव राठीने सहभाग घेतला होता.

प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या! बंगळुरूतील आंदोलनात सहभागानंतर माजी IPS अधिकाऱ्याचे गृहमंत्रालयाला पत्र
druv rathee

Former IPS Officer Letter to MHA about Dhruv Rathee’s Visa OCI Status: प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. कर्नाटकातील माजी आयपीएस अधिकारी आणि बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी थेट केंद्रीय गृहमंत्रालयाला (Ministry of Home Affairs) पत्र लिहून ध्रुव राठीच्या नागरिकत्व, व्हिसा आणि इमिग्रेशन स्टेटसची सखोल चौकशी करण्याची अधिकृत मागणी केली आहे. 08 ऑक्टोबर 2026 रोजी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि इतर नागरी संघटनांतर्फे आयोजित एसआयआर (SIR) प्रक्रियेविरोधातील आंदोलनात ध्रुव राठीने सहभाग घेतला होता. या आंदोलनात त्याने निवडणूक आयोगावर कडक टीका करत एसआयआर प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा पूर्णपणे अभाव असल्याचा थेट आरोप केला होता.

जर्मन नागरिकत्व अन् ओसीआय कार्डच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय
गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी ध्रुव राठीच्या पासपोर्टचा प्रकार, व्हिसाची श्रेणी आणि त्याच्या भारतात येण्याच्या मुख्य उद्देशाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. ध्रुव राठी याच्याकडे जर्मन नागरिकत्व असल्याचा संशय व्यक्त करत, त्याच्याकडे ओसीआय (OCI Card) किंवा इतर कोणताही विशेष दर्जा आहे का, याची पडताळणी करण्याची विनंती त्यांनी केली आहे. एखाद्या परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला भारतातील निवडणूक प्रक्रियेशी आणि राजकीय विषयाशी संबंधित अशा संघटित आंदोलनात सहभागी होण्याची कायदेशीर परवानगी आहे का, असा गंभीर प्रश्नही त्यांनी या पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

हेही वाचा – CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा निर्णय! 9 आणि 10 ऑक्टोबरला ड्राय डे जाहीर

‘सरप्राइज गेस्ट’ म्हणत अभिनेते प्रकाश राज यांच्याकडून ध्रुव राठीचे स्वागत
8 ऑक्टोबर रोजी बंगळुरूतील फ्रीडम पार्कमध्ये मतदार यादीतून नावे वगळल्याच्या आणि एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात ध्रुव राठीने सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केले होते. या आंदोलनात सहभागी झालेले दाक्षिणात्य व बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी ध्रुव राठीचे या आंदोलनातील ‘सरप्राइज गेस्ट’ म्हणून स्वागत केले होते आणि त्याला स्टेजवर आमंत्रित केले होते. ध्रुव राठीच्या या सहभागामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, आता त्याच्या व्हिसा नियमांच्या उल्लंघनावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

निवडणूक आयोगाविरोधात देशभरात विरोधी पक्षांची आंदोलने तीव्र
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) दरम्यान मोठ्या प्रमाणावर वैध मतदारांची नावे मतदार यादीतून बेकायदेशीरपणे वगळल्याचा आरोप करत देशभरात निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील संसद मार्ग आणि जंतर-मंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष निवडणुकीची मागणी लावून धरली आहे, ज्यामध्ये आता ध्रुव राठीच्या सहभागामुळे या संपूर्ण प्रकरणाला कायदेशीर आणि राजकीय वळण मिळाले आहे.

हेही वाचा – जंतर-मंतरवर आंदोलने का होतात? त्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते? जाणून घ्या नियमांची A To Z माहिती

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number