Saturday, June 14, 2025 04:34:44 AM

शरीरसंबंधांना नकार दिल्याने पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; चेंबूरमधील धक्कादायक घटना

मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

शरीरसंबंधांना नकार दिल्याने पत्नीला जाळण्याचा प्रयत्न चेंबूरमधील धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरसीएफ पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

नेमकं घडलं तरी काय?
चेंबूर परिसरात राहणारी पीडित महिला घरकाम करते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जायला निघाली होती. त्यावेळी पतीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. कामावर जायला उशिर होत असल्याने महिलेने पतीला विरोध केला. त्यानंतर त्याने पत्नीसोबत वादविवाद करण्यास सुरुवात केली. त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. 

हेही वाचा : लातूरच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य उपसंचालकाच्या आदेशाला केराची टोपली
पोलिसांच्या माहितीनुसार, रागाच्या भरात पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. यानंतर आरोपीने तिच्यावर जळत्या कागदाचा तुकडा फेकला. यात महिलेची छाती, पोट. पाय आणि हात गंभीर भाजलेला आहे. घटनेनंतर महिलेला तातडीने सायन रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. सध्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. 
महिलेच्या तक्रारीवरुन, आरसीएफ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 352 आणि 115(2) अंतर्गत आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री